औरंगाबाद : आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन आज भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहे. आज सांयकाळी जे. पी. नड्डा यांची जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार आहे. या सभेपासून लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार करत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार भागवत कराड यांनी दिली आहे.
संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य..! फडणवीसांनी अजित पवारांना घेतले धारेवर
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर राज्यातील शिंदे सरकार पडणार असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. त्यावर बोलताना कराड म्हणाले की, काही दिवसापुर्वी असेच काही बडबड करीत होते. त्यानंतर ते तुरूंगात गेले, त्यातून ते सुटले, आता परत त्यांची अशी बडबड सुरू झाली आहे. परंतु त्या बडबडीकडे जनतेचं आता लक्ष्य नाही. असंही त्यांनी म्हटलं.
तसेच मी ग्रामीण भागातील आहे. एखादी भाजी बाजूला काढून टाकली की, ती आपण खात नाही. त्यामुळे लोकं आता त्यांना फार सिरीअसली घेणार नाहीत. त्यामुळे हिंदुत्वासाठी भाजप आणि शिवसेना एकत्रित लढली. परंतु 2019 मध्ये काय झालं हे सर्वांना माहिती आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- “भाजपचं लक्ष्य 145 असेल तर शिंदे गट काय भाजपची धुणीभांडी करणार”?
- “नितेश राणेंनी आपली उंची अन् लायकी पाहून बोलावे, नाहीतर धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल”
- ठरलं तर…! 15 महापालिका, 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल या तारखेला वाजणार..?
- “जो हरला त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा”, अमोल मिटकरींनी थेट दिलं आवाहान
- “भुरटी लोक, बिन बुडाची पेंद्याची कुठेही जातात,”; राज ठाकरे अन् राणेंच्या भेटीवर ठाकरे गटाची जहरी टिका