मुंबई : किरीट सोमय्या हा काही महात्मा नाही. जोपर्यंत त्यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले आहेत. अन् ते तुमच्या पक्षात गेले त्यांचं काय झालं? ते अगोदर किरीट सोमय्यांनी सांगावं. असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सोमय्यांना खडसावून सांगितलं आहे. नवीन वर्षाच्या संध्येला किरीट सोमय्यांनी पाच नेत्यांची नावं जाहीर केले आहेत.
किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, नवीन वर्ष सुरू होणाऱ्या नवीन वर्षात ठाकरे परिवाराचे 19 बंगल्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे. तसेच काॅंग्रेसचे नेते असलम शेख यांचे 49 स्टुडिओ, शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा साई रिसोर्ट, शिवेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर, हसन मुश्रीप, मुंबई महापालिकेचा महाघोटाळा यांचा हिशोब पुर्ण करणार असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य..! फडणवीसांनी अजित पवारांना घेतले धारेवर
ज्या 19 बंगल्याचा किरीट सोमय्यांनी आरोप केला आहे. ते बंगलेच नाही. त्यामुळे कुणी उचलली जीभ लावली टाळ्याला. त्याला जास्त महत्व देऊ नये. तसेच किरीट सोमय्यांची सध्या राजकारणाची पातळी राहिली नाही. सोमय्यांना तुम्ही दत्तक घेतलं आहे का? असा सवाल देखील त्यांनी पत्रकारांना करत सोमय्यांवर जहरी टिका केली.
Read also
- “संजय राऊत म्हणजे जनतेसाठी विटलेली भाजी आणि कडी”, भाजपची जोरदार टिका
- “भाजपचं लक्ष्य 145 असेल तर शिंदे गट काय भाजपची धुणीभांडी करणार”?
- “नितेश राणेंनी आपली उंची अन् लायकी पाहून बोलावे, नाहीतर धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल”
- ठरलं तर…! 15 महापालिका, 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल या तारखेला वाजणार..?
- “जो हरला त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा”, अमोल मिटकरींनी थेट दिलं आवाहान