मुंबई : राज्यात सध्या ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागाची जबाबदारी ठाकरेंनी आपल्या नेत्यांना दिली आहे. यातच संजय राऊतांनी कोल्हापुर दौऱ्यावर असतांना वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. यानंतर भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळत आहेत. अशातच भाजपचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची सुरक्षा काढून घेण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा..“छी..छी.. त्यावर कोण बोलणार?” नितेश राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
निलेश राणे यांनी फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आणि आदित्य ठाकरे हे विधानसभेचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारने त्याना पोलीस संरक्षण दिले आहे. पण माझ्या वाचण्यामध्ये आणि बघण्यामध्ये त्यांना पोलीस संरक्षण देण्याची काहीच गरज वाटत नाही. खासदार संजय राऊत हे स्वतःहून म्हणाले • आहेत त्यांना पोलीस संरक्षणाची गरज नाही, आणि आदित्य ठाकरे हे फक्त साधे आमदार आहेत. त्यांना कुठलीही धमकी आलेली नाही किंवा त्यांनी स्वत तक्रार नोंदविलेली नाही. त्यांना कोणत्याही दहशतवाद्याची किंवा गैंगस्टर ची धमकी नाही किंवा त्यानी असा कोणताही प्रश्न उचललेला नाही जेणेकरून कुठला वर्ग त्यांना मारण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा..“मी ही बापटांविरोधात निवडणुक लढवली होती, पण त्यांनी कधी असं केलं नाही”,रवींद्र धंगेकरांचं विधान
जसे इतर आमदार खासदार काम करतात तसेच हे त्यांच्या पदावर काम करत आहेत. त्यात वेगळेपण असे काहीच नाही. जर यांना संरक्षण मिळाले आणि यांच्यापेक्षा चांगले काम करणाऱ्यांना संरक्षण मिळाले नाही तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. म्हणून पोलीस डिपार्टमेंट नी सुद्धा यांच्या जीवाला धोका आहे अस कुठे नोंदविलेले नाही किंवा त्याबद्दल चर्चाही नाही. म्हणून माझी विनंती आहे की यांचे पोलीस संरक्षण काढण्यात यावे कारण यांना संरक्षण देणे गरजेचे नाही. तेच पोलीस महाराष्ट्राच्या मुंबईच्या इतर महत्वाच्या विषयांसाठी काम करू शकतात. त्यांना महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या कामासाठी आपण कार्यरत करावे, ही विनंती.
संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या दोघांना पोलीस संरक्षण देण्याची काही गरज दिसत नाही. त्यांच्या वर अशी कुठली ही परिस्थिती नाही म्हणून या दोघांचं पोलीस संरक्षण काढून टाकावं. pic.twitter.com/1i4U2Mieg2
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 3, 2023
Read also
- हेही वाचा..““रोज उठा आदित्यांना शिव्या द्या, अन् प्रसिद्धी मिळवा, मनसेचा हा नवा धंदा,” आदित्य ठाकरेंची बोचरी टिका
- हेही वाचा..“रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला,” एसटी कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानंतर अजित पवारांचा संताप
- हेही वाचा..‘शिट्टी ‘ने घड्याळाचे काटे बंद केले, पण राहुल कलाटे डिपॉझिट वाचू शकले नाहीत, वाचा सविस्तर
- हेही वाचा..“माणसं नसतांना, फेसबुक लाईव्ह असतांना, चहापाणी कसा झाला?” अजित पवारांना उत्तर शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
- हेही वाचा..पोलीस भरतीचा तो मुद्दा अजित पवारांनी सभागृहात मांडला, राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी