मुंबई : एसटीच्या मोडक्या, तुटक्या बसवर राज्यशासनाची जाहीरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला, असा प्रकार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावं, कारवाई करायचीच असेल तर, ज्यांनी शासनात बसून जाहिरातीचं टेंडर काढलं. असं म्हणत अजित पवारांनी सभागृहात राज्य सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा..“कसब्याचा पराभव भाजपच्या जिव्हारी, पुणे भाजपात भुकंप होण्याच्या हालचाली सुरू”?
ज्यांनी मोडक्या एसटीवर जाहिरात दिली. मोडक्या एसटीवर जाहिरात दिल्याचं लक्षात येऊनहीं, पैशांचा अपव्यय होऊ दिला, त्यांच्यावर कारवाई करावी. एसटी महामंडळ आणि एसटीची प्रवासी सेवा हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. ग्रामीण, दुर्गम भागात आजही एसटी हीच प्रवासाचं साधन आहे. एसटीचा वापर राजकारणासाठी न करता, महाराष्ट्राच्या विकासासाठी झाला पाहिजे. असंही अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा..सतेज पाटलांकडे काॅंग्रेसने दिली मोठी जबाबदारी, विधानभवनात सत्ताधाऱ्यांना वेठीस आणणार ?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, राज्यात, फक्त एकाच एसटी बसची दुरवस्था झालेली नाही. अशा हजारो नादुरूस्त, मोडक्या तुटक्या बस रस्त्यावर धावत आहेत. त्या चालवणाऱ्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार का? अशा पद्धतीने सर्वच कर्मचाऱ्यांना निलंबित करावे लागेल. एकही एसटी बस रस्त्यावर धावू शकणार नाही. त्यातून ग्रामीण जनतेची गैरसोयच होणार असंही ते म्हणाले.
Read also
- हेही वाचा..‘शिट्टी ‘ने घड्याळाचे काटे बंद केले, पण राहुल कलाटे डिपॉझिट वाचू शकले नाहीत, वाचा सविस्तर
- हेही वाचा..“माणसं नसतांना, फेसबुक लाईव्ह असतांना, चहापाणी कसा झाला?” अजित पवारांना उत्तर शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
- हेही वाचा..पोलीस भरतीचा तो मुद्दा अजित पवारांनी सभागृहात मांडला, राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी
- हेही वाचा..“छी..छी.. त्यावर कोण बोलणार?” नितेश राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
- हेही वाचा..“मी ही बापटांविरोधात निवडणुक लढवली होती, पण त्यांनी कधी असं केलं नाही”,रवींद्र धंगेकरांचं विधान