मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुकातील यश आणि कसब्यातील पोटनिवडणुकांच्या विजयानंतर काॅंग्रेसला राज्यात बळ मिळालं आहे. त्यामुळे आता राज्यात काॅंग्रेसने पक्षांतर्गत हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र विधानमंडळ काॅंग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा..“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला
महाराष्ट्र विधानमंडळ काॅंग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सतेज पाटील यांची गटनेतेपदी निवड केली आहे. यानिवडीनंतर सतेज पाटील यांनी काॅंग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा..तिरंगी लढतीत अश्विनी जगतापांची बाजी..! तब्बल 36 हजार 70 मतांनी दणदणीत विजय
सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस असून सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. यातच विधान परिषदेत देखील सत्ताधाऱ्यांना वेठीस धरणारं नेतृत्व असायला हवं. त्या दृष्टीकोनातून काॅंग्रेसने सतेज पाटील यांची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री. @satejp यांचे हार्दिक अभिनंदन. pic.twitter.com/WxO0dhfGFe
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 2, 2023
Read also
- हेही वाचा..“होय मी हिंदू, पण मी १०००००००००००% मनुवादीसनातन धर्माच्या विरोधात,” जितेंद्र आव्हाड
- हेही वाचा..“मला उमेदवारी दिली असती तर रवींद्र धंगेकरांसारखा विजयी झालो असतो”, राहुल कलाटेंची खदखद
- हेही वाचा..“संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी संजय राऊत, आदित्य ठाकरेंना अटक करा,” मनसे नेत्याची मागणी
- हेही वाचा..मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला… राज्यात एकच खळबळ, मनसैनिक आक्रमक
- हेही वाचा..“..तर देशाला बाहेर पडायलाही वेळ लागणार नाही”, धंगेकरांच्या विजयानंतर ठाकरेंची प्रतिक्रिया