पुणे : अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. तब्बल २८ वर्षाचा भाजपचा हा बाल्लेकिल्ला रवींद्र धंगेकरांनी उद्धवस्त केला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना 73194 तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 62244 मत पडली आहे. त्यावरून आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू..!” चंद्रकांत पाटलांनी कसब्यातील मतदारांचे मानले आभार..!
कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी जिंकल्यानंतर मला नक्कीच आनंद झाला आहे. इतक्या वर्षाच्या भ्रमातून जर कसबा मतदारसंघ बाहेर पडत असेल तर देशाला बाहेर पडायलाही वेळ लागणार नाही. अशी शक्यता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…सत्तासंघर्षाची सुनावणी २ तासांत संपली, शिंदेंच्या वकिलांनी कोर्ट गाजवलं, पुढची तारीख आता होळीनंतर
चंद्रकांत पाटलांनी याबाबत ट्विट करत जनतेचा कौल नम्रपणे स्विकारत असल्याचं म्हटलं आहे. “कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू..!” असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला
- हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला
- हेही वाचा..““कुणाल टिळक याला भाजपतर्फे उमेदवारी न देण्यामागे कारण होतं,” निकालानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..तिरंगी लढतीत अश्विनी जगतापांची बाजी..! तब्बल 36 हजार 70 मतांनी दणदणीत विजय
- हेही वाचा..पोटनिवडणूक निकाल : राष्ट्रवादीची परावलंबी मानसिकता अन् स्थानिक नेत्यांचे अपयश!