पिंपरी : विशेष प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकणे सहज शक्य असताना केवळ परावलंबी मानसिकता आणि स्थानिक नेत्यांच्या बेसाधपणामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन भाजपाकडून करण्यात आले होते. त्यावेळी निवडणूक लढायची की बिनविरोध करायची? असे दोन मतप्रवाह राष्ट्रवादीत पहायला मिळाले. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह काही नेत्यांची भूमिका ही निवडणूक बिनविरोध करण्याची होती. त्याचेवळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह काही नेत्यांची भूमिका निवडणूक लढण्याची होती. त्यामुळे निवडणुकीबाबत निर्णय घेताना एकमत नव्हते. यावर शिक्कामोर्तब झाले. हा वाद विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘कोर्टात’ गेला. आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक कशी महत्वाची आहे? याबाबत अजित पवार यांना सांगण्यात आले. त्यावर पवार यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली.
हेही वाचा..सभागृहात शरद पवारांचा ‘एकेरी’ उल्लेख, अजित पवारांनी हात जोडले, पण विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
दरम्यान, निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यानंतर उमेदवार कोण? यावरुन राष्ट्रवादीत एकमत झाले नव्हते. राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळावी म्हणून एक गट कार्यरत होता. तर दुसरा एक गट नाना काटे यांच्यासाठी प्रयत्न करीत होता. अखेर नाना काटे यांनी बाजी मारली. त्यांना उमेदवारी जाहीर झाली. शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीसाठी ‘वेटिंग’वर ठेवल्याचा राग धरुन नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली.
हेही वाचा…“नवाब मलिक देशद्रोही, मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम, सभागृहात अनिल परब कडाडले”
आमदार सुनील शेळके हस्तक्षेपामुळे नाराजी?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निवडणुकीत स्थानिक नेत्यांवर अविश्वास दाखवला. शहरातील काही मंडळी मैत्री, नाती-गोत्याचे राजकारण करतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दगाफटका होईल, अशी असुरक्षितता दिसली. त्यामुळे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे संपूर्ण निवडणूक यंत्रणा सोपवण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले जात नाही, असा संदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला होता. तसेच, आमदार शेळके यांच्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांचा एक गट नाराज होता. त्यांनी उत्साहाने निवडणुकीचे काम केले नाही. विशेष म्हणजे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनाही निवडणुकीतील महत्त्वाच्या निर्णयापासून बाजूला ठेवल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा..“संजय राऊतांच्या मदतीला धावले शरद पवार,” हक्कभंगाच्या प्रस्तावावरून सरकारला सुनावले खडेबोल
परावलंबी भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे नुकसान…
राष्ट्रवादीकडून राज्यातील दिग्गजांची फौज चिंचवडच्या मैदानात उतरवण्यात आली. त्याला महाविकास आघाडी म्हणन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवरांनी शहरात प्रचार केला. या प्रचाराची यंत्रणा राबवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांना मावळातील आपली ‘स्वतंत्र टीम’ कार्यान्वीत करावी लागली. तसेच, नाना काटे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असणाऱ्या भाजपातील काही नाराज मंडळींनीही ऐनवेळी तटस्थ भूमिका ठेवली. लाढाईच्या तोंडावर राष्ट्रवादीची एकजूट विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. काही मोजके पदाधिकारी वगळता अनेकांनी ‘हजेरी लावण्यापुरते’ काम केल्याचे भासवले. त्यामुळे राष्ट्रवादीने विजय दृष्टीक्षेपात असताना पोटनिवडणुकीची जागा गमावली.
Read also
- हेही वाचा..“नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू..!” चंद्रकांत पाटलांनी कसब्यातील मतदारांचे मानले आभार..!
- हेही वाचा…सत्तासंघर्षाची सुनावणी २ तासांत संपली, शिंदेंच्या वकिलांनी कोर्ट गाजवलं, पुढची तारीख आता होळीनंतर
- हेही वाचा..“बापटानंतर पुणे भाजपचं काय होणार ? पोटनिवडणुकीत जनतेतील नेताच दिसेना !
- हेही वाचा..पुण्यातील पोटनिवडणूका राज्याच्या राजकारणाचा कल ठरवणार!
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक निकाल : भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्या विजय निश्चित; तब्बल ३५ हजार मतांधिक्यानी निवडून येण्याची शक्यता