मुंबई : पोटनिवडणुकांचा निकाल, संजय राऊतांवर हक्कभंगाचा प्रस्ताव, आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील खडाजंगीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवाब मलिक देशद्रोही असल्याचं वक्तव्या केल्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांनी चहापाण्याच्या कार्यक्रमाला बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा विधान परिषदेच्या सभागृहात मुख्यमंत्री आणि विरोधक आमनेसामने बघायला मिळाले.
हेही वाचा..“कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
नवाब मलिक हे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते. त्यांच्यावर एनआयए, ईडी मध्ये जे गुन्हे दाखल झालेत. या गुन्हांच्या संबंधीत देशद्रोही दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम शेख, छोटा शकिल, जावेद चिकना, टायगर मेमन इक्लबाल मिर्ची आणि हसिना पालकर या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. मग देशद्रोहीसोबत संबंध असलेल्या नवाब मलिकांचा तुरूंगात गेल्यावरही राजीनामा मागितला नाही. त्यांना पाठिशी घातलं. त्यामुळे अशा देशद्रोहींशी संबंध असणाऱ्या लोकांशी चहापाणीचं माझं टळलं असं मी म्हणालो आहे. अन् माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. असं एकनाथ शिंदे यांनी सभागृहात म्हटलं.
हेही वाचा..““कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
त्यानंतर आमदार अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. २०१४ ला भाजपचं राज्यात सरकार आलं. त्याच्यात शिवसेनाही होती. पाच वर्षात नवाब मलिक कधीच देशद्रोही सापडले नाहीत. 2019 ला आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळी मंत्री होते. अडीच वर्ष नवाब मलिक देशद्रोही नव्हते. देशद्रोहाचा मुद्दा आता आला. महाविकास आघाडीच्या बैठकीत जे निर्णय झालेत. मंत्र्यांचे राजीनामे घ्यायचे की नाही. ते त्यातले एक भाग होते. मग आता का ? असा सवाल करीत आम्ही देशद्रोहाचं समर्थन कधीच करणार नाहीत. असं म्हणत अनिल परबांनी सभागृहाचं वातावरण तापवून दिलं.
Read also
- हेही वाचा..“संजय राऊतांच्या मदतीला धावले शरद पवार,” हक्कभंगाच्या प्रस्तावावरून सरकारला सुनावले खडेबोल
- हेही वाचा..“चिंचवडच्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटेंना भाजपनेच..” अजित पवारांचा गंभीर आरोप
- हेही वाचा..“थोडी खुशी-थोडी गम अशी माझी अवस्था झाली”, पोटनिवडणुकांच्या निकालांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“पैशांचा पाऊस थांबला अन् आज मतांचा पाऊस झाला”, विजयी उमेदवार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
- हेही वाचा.“भाजपचा 28 वर्षाचा बाल्लेकिल्ला आघाडीकडून उद्धवस्त,” धंगेकरांचा रासनेंवर 11 हजार 40 मतांनी विजय