पुणे : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांचा कल हाती लागला आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाली आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयाच्या वाटेवर आहेत. २९ व्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांना १०८३४४ मत पडली असून त्यांनी जवळपास २६,३३९ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे. यातच त्यांचा तब्बल ३५ हजार मताधिक्यांनी निवडून येण्याची शक्यता आता वर्तण्यात येत आहे.
हेही वाचा..“पैशांचा पाऊस थांबला अन् आज मतांचा पाऊस झाला”, विजयी उमेदवार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी- शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी दमदार विजय मिळवणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आतापर्यंत ३७ पैकी २७ फेऱ्यांची मतमोजणी झाली असून, यामध्ये तब्बल २१ हजार ४७ मतांची आघाडी जगताप यांनी घेतली आहे. अद्याप १० फेऱ्या बाकी आहेत.
“भाजपचा 28 वर्षाचा बाल्लेकिल्ला आघाडीकडून उद्धवस्त,” धंगेकरांचा रासनेंवर 11 हजार 40 मतांनी विजय
२७ व्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांनी एकूण १ लाख १ हजार ९४९ मिळवली आहेत. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी ८० हजार ९०२ मते, तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी ३० हजार ९३ मते मिळवली आहेत.
Read also
- हेही वाचा..सभागृहात शरद पवारांचा ‘एकेरी’ उल्लेख, अजित पवारांनी हात जोडले, पण विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
- हेही वाचा…“नवाब मलिक देशद्रोही, मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम, सभागृहात अनिल परब कडाडले”
- हेही वाचा..“संजय राऊतांच्या मदतीला धावले शरद पवार,” हक्कभंगाच्या प्रस्तावावरून सरकारला सुनावले खडेबोल
- हेही वाचा..“चिंचवडच्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटेंना भाजपनेच..” अजित पवारांचा गंभीर आरोप
- हेही वाचा..“थोडी खुशी-थोडी गम अशी माझी अवस्था झाली”, पोटनिवडणुकांच्या निकालांवर अजित पवारांची प्रतिक्रिया