मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत वादळी ठरतांना दिसत आहेत. काल संजय राऊतांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते. यातच आज भाजपचे आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांंचा ऐकरी उल्लेख केल्याने सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावर बोलतांना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आक्षेप नोंदवत हात जोडले अन् विरोधकांना कडक शब्दात इशारा दिला.त्यानंतर विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी यात मध्यस्थी केली.
“भाजपचा 28 वर्षाचा बाल्लेकिल्ला आघाडीकडून उद्धवस्त,” धंगेकरांचा रासनेंवर 11 हजार 40 मतांनी विजय
सभागृहात असा पायंडा पडत असेल तर आमच्या बाजूने देखील वरिष्ठांवर अशा प्रकारचे वक्तव्य केलं जातील. मग माफी मागितली जाणार नाहीत. मग तुम्ही रेकार्ड तपासा, ठेवायचं असेल तर ठेवा. ह्या नवीन गोष्टी करू नका. अध्यक्ष महोदय , माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. त्यांना यामध्ये वाईट वाटायचं काही कारण नाही. आम्ही समोरच्या नेत्यांचा आदर करतो. तसाच आदर त्यांनी देखील केलं पाहिजे. असं अजित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा..“कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
या सभागृहात कोणत्याही नेत्यांवर ऐकरी बोललं असेल तर ते स्विकारलं जाणार नाही. त्यावर मला रेकार्ड तपासून घ्यावं लागेल. जर रेकार्डवर असं काही दिसलं तर ते रेकार्डवरून काढून टाकू, असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं. त्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सभागृहाची माफी मागितली. त्यानंतर त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.
Read also
- हेही वाचा…“नवाब मलिक देशद्रोही, मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम, सभागृहात अनिल परब कडाडले”
- हेही वाचा..“संजय राऊतांच्या मदतीला धावले शरद पवार,” हक्कभंगाच्या प्रस्तावावरून सरकारला सुनावले खडेबोल
- हेही वाचा..“चिंचवडच्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटेंना भाजपनेच..” अजित पवारांचा गंभीर आरोप
- हेही वाचा..“थोडी खुशी-थोडी गम अशी माझी अवस्था झाली”, पोटनिवडणुकांच्या निकालांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“पैशांचा पाऊस थांबला अन् आज मतांचा पाऊस झाला”, विजयी उमेदवार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया