पुणे : अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. तब्बल २८ वर्षाचा भाजपचा हा बाल्लेकिल्ला रवींद्र धंगेकरांनी उद्धवस्त केला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना 73194 तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 62244 मत पडली आहे. त्यावरून आता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“नवाब मलिक देशद्रोही, मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम, सभागृहात अनिल परब कडाडले”
चंद्रकांत पाटलांनी याबाबत ट्विट करत जनतेचा कौल नम्रपणे स्विकारत असल्याचं म्हटलं आहे. “कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू..!” असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“संजय राऊतांच्या मदतीला धावले शरद पवार,” हक्कभंगाच्या प्रस्तावावरून सरकारला सुनावले खडेबोल
तर यानिवडणुकीबाबत हेमंत रासने यांनी देखील मतदारांचे आभार मानले आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मी नम्रपणे स्विकारतो. या निवडणुकीत भाजप महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे वरीष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जीवाचं रान केलं, मात्र अपेक्षित यशाने हुलकावणी दिली. संघटना नाही, तर मी वैयक्तिकदृष्ट्या कमी पडलो, ही माझी भावना आहे. विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भारतीय जनता पार्टीने आजवर अनेक विजय मिळवले, अनेक पराभव पदरी पडले. पण पार्टीचे कार्यकर्ते कधीही खचून गेले नाही, जाणारही नाही. याही अपयशाने आम्ही कोणीही खचणार नाही. निश्चितच नव्याने भरारी घेऊ ! कसब्यात भारतीय जनता पार्टीसह मी आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे. आपण नेहमीप्रमाणे कधीही हाक देऊ शकता! असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे ‘सामर्थ्य’ नाशवंत नाही ! pic.twitter.com/6VjF1wh2uY
— Hemant Rasane (@HemantNRasane) March 2, 2023
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.
नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू!— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 2, 2023
Read also
- हेही वाचा…सत्तासंघर्षाची सुनावणी २ तासांत संपली, शिंदेंच्या वकिलांनी कोर्ट गाजवलं, पुढची तारीख आता होळीनंतर
- हेही वाचा..“बापटानंतर पुणे भाजपचं काय होणार ? पोटनिवडणुकीत जनतेतील नेताच दिसेना !
- हेही वाचा..पुण्यातील पोटनिवडणूका राज्याच्या राजकारणाचा कल ठरवणार!
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक निकाल : भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्या विजय निश्चित; तब्बल ३५ हजार मतांधिक्यानी निवडून येण्याची शक्यता
- हेही वाचा..सभागृहात शरद पवारांचा ‘एकेरी’ उल्लेख, अजित पवारांनी हात जोडले, पण विरोधकांना दिला ‘हा’ इशारा