पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीच्या तिरंगी लढतीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यावर तब्बल 36 हजार 70 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका नाना काटे यांना बसला आहे. यातच अश्विनी जगताप यांच्या विजयाने चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.
हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणूक निकाल : भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्या विजय निश्चित; तब्बल ३५ हजार मतांधिक्यानी निवडून येण्याची शक्यता
भरघोस मतांनी विजय झाल्यानंतर अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, ” हा माझा आणि सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. राहुल कलाटे यांच्यामुळेच मला फायदा झाला असं मला वाटत नाही. हा आम्ही केलेल्या विकास कामांचा विजय आहे. आज साहेब नाहीत पण त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा विचार आमच्यासोबत आहे. साहेब आमच्यात नाही. त्यामुळे विजयाचा जल्लोष करणार नाही. असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.
हेही वाचा..सभागृहात शरद पवारांचा ‘एकेरी’ उल्लेख, अजित पवारांनी हात जोडले, पण विरोधकांना दिला ‘हा’ इशारा
“पिंपरी-चिंचवडकरांनी विकासाच्या मुद्दांवर मतदान केले. दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांनी शहराच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्याचे स्मरण इथल्या भूमिपुत्रांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी ठेवले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत स्वत: लक्ष घातले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर विश्वास ठेवून सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यानंतरसुद्धा अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपा-शिवसेना महायुतीवर विश्वास दाखवला. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. या निवडणुकीत रात्रं-दिवस मेहनत घेणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या एकत्रित लढ्याचा हा विजय आहे. शहराच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा विजय आम्ही दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना समर्पित करतो.” अशी प्रतिक्रिया भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
Read also
- हेही वाचा..पोटनिवडणूक निकाल : राष्ट्रवादीची परावलंबी मानसिकता अन् स्थानिक नेत्यांचे अपयश!
- हेही वाचा..“नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू..!” चंद्रकांत पाटलांनी कसब्यातील मतदारांचे मानले आभार..!
- हेही वाचा…सत्तासंघर्षाची सुनावणी २ तासांत संपली, शिंदेंच्या वकिलांनी कोर्ट गाजवलं, पुढची तारीख आता होळीनंतर
- हेही वाचा..“बापटानंतर पुणे भाजपचं काय होणार ? पोटनिवडणुकीत जनतेतील नेताच दिसेना !
- हेही वाचा..पुण्यातील पोटनिवडणूका राज्याच्या राजकारणाचा कल ठरवणार!