मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कवर सकाळी हल्ला अज्ञातांनी हल्ला केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला मार बसला आहे. त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले असून हा हल्ला कोणी केला आहे. ते माहित असून आम्ही याला भीक घालत नसल्याचं देशपांडे यांनी सांगितलं.
हेही वाचा..तिरंगी लढतीत अश्विनी जगतापांची बाजी..! तब्बल 36 हजार 70 मतांनी दणदणीत विजय
तर या हल्ल्याबाबत खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना अटक करून त्यांची चौकशी करा. अशी मागणी मनसेचे नेते अमोल खोपकर यांनी केली आहे. मागील काही महिन्यापासून मुंबई महापालिकेतील घोटाळे संदीप देशपांडे सातत्याने काढत आहेत. त्याचा राग त्यांच्यावर काढण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.
हेही वाचा..पोटनिवडणूक निकाल : राष्ट्रवादीची परावलंबी मानसिकता अन् स्थानिक नेत्यांचे अपयश!
तर हल्ला झाल्यानंतर संदीप देशपांडे यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेचच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रूग्णालयात जाऊन संदीप देशपांडे यांची चौकशी केली.
Read also
- हेही वाचा..मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला… राज्यात एकच खळबळ, मनसैनिक आक्रमक
- हेही वाचा..“..तर देशाला बाहेर पडायलाही वेळ लागणार नाही”, धंगेकरांच्या विजयानंतर ठाकरेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला
- हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला
- हेही वाचा..““कुणाल टिळक याला भाजपतर्फे उमेदवारी न देण्यामागे कारण होतं,” निकालानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया