मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. त्यानंतर त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू केले आहे. या हल्लानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहेत. तर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा..पोटनिवडणूक निकाल : राष्ट्रवादीची परावलंबी मानसिकता अन् स्थानिक नेत्यांचे अपयश!
सकाळी मार्निंग वॉकला संदीप देशपांडे रोज शिवाजी पार्कवर जातात. रोज त्यांच्यासोबत पाच ते सहा जण असतात. मात्र आज ते एकटे गेल्याने त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्यावर टॅम्पने हल्ला केला आहे. त्यांच्या पायाला आणि हाताला मार लागला आहे. पायाला जास्त मार लागला आहे. मात्र डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र कुठेही मार लागला नाही, अशी माहिती मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी दिली आहे.
हेही वाचा..“नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू..!” चंद्रकांत पाटलांनी कसब्यातील मतदारांचे मानले आभार..!
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुजा रूग्णालयात जाऊन चौकशी केली. यातच आता पोलिसांनी हल्लेखोरांची माहिती घेऊन त्यांना लगेचच अटक करावी, नाहीतर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावं लागेल. असा इशारा मनसैनिकांनी दिला आहे.
Read also
- हेही वाचा..“..तर देशाला बाहेर पडायलाही वेळ लागणार नाही”, धंगेकरांच्या विजयानंतर ठाकरेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला
- हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला
- हेही वाचा..““कुणाल टिळक याला भाजपतर्फे उमेदवारी न देण्यामागे कारण होतं,” निकालानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..तिरंगी लढतीत अश्विनी जगतापांची बाजी..! तब्बल 36 हजार 70 मतांनी दणदणीत विजय