पुणे : महाविकास आघाडीकडून मीच सक्षम उमेदवार होतो. मला उमेदवारी दिली असती तर रवींद्र धंगेकरांसारखा विजयी झालो असतो. माझ्या सारक्या कार्यकर्त्याला डावलायला नको होतं. अशी खदखद चिंचवडच्या पोटनिवडणुकीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त करून दाखवली आहे. काल चिंचवड पोटनिवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर ते बोलत होते.
हेही वाचा..““कुणाल टिळक याला भाजपतर्फे उमेदवारी न देण्यामागे कारण होतं,” निकालानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया
काल झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या ३७ व्या फेरीनंतर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली आहे. त्यामुळे अश्विनी जगताप यांना ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत.
हेही वाचा..तिरंगी लढतीत अश्विनी जगतापांची बाजी..! तब्बल 36 हजार 70 मतांनी दणदणीत विजय
राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली नसती तर त्याठिकाणी देखील महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला असता. अशा प्रतिक्रिया राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत आहेत. तर या प्रतिक्रियांवर राहुल कलाटे यांनी बोलायचं टाळलं. तसेच ह्या पोटनिवडणुकीत विजयी आमदारांना अभिनंदन करतो. तसेच येत्या १७ ते १८ महिन्यानंतर पुन्हा निवडणुक येत आहे. त्याची आता आम्ही तयारी करत आहोत. असंही राहुल कलाटे यांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा..“संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी संजय राऊत, आदित्य ठाकरेंना अटक करा,” मनसे नेत्याची मागणी
- हेही वाचा..मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला… राज्यात एकच खळबळ, मनसैनिक आक्रमक
- हेही वाचा..“..तर देशाला बाहेर पडायलाही वेळ लागणार नाही”, धंगेकरांच्या विजयानंतर ठाकरेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा..“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला
- हेही वाचा…“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला