मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस भाजप आमदार राम सातपुते यांनी शरद पवारांचा ऐकरी उल्लेख केल्याने गाजला. यावेळी विरोधकांनी जोपर्यंत राम सातपुते माफी मागत नाही. तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर भाजप आमदारांनी मध्यस्थी करत राम सातपुते यांनी सभागृहाची माफी मागितली. यातच राम सातपुते यांनी आव्हाडांवर गंभीर आरोप केलेत. त्यावर आज आव्हाडांनी एक ट्विट केलं आहे.
हेही वाचा..तिरंगी लढतीत अश्विनी जगतापांची बाजी..! तब्बल 36 हजार 70 मतांनी दणदणीत विजय
काल सभागृहात राम सातपुते चांगलेच आक्रमक झालेत. जितेंद्र आव्हाड मला दलित आमदार म्हणून हिनवत आहेत. हो मी दलित आहे, मी हिंदू दलित आहे. माझ्या बापाने चपला शिवल्या, त्याचा मला अभिमान आहे. मी सनातन हिंदू धर्मात जन्म घेतलाय. त्याचा मला अभिमान आहे. मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून म्हणून मी आमदार आहे. मला यांच्या पक्षाच्या शरद पवाराने आरक्षण दिलं नाही. असा उल्लेख राम सातपुते यांनी केला होता.
हेही वाचा..““कुणाल टिळक याला भाजपतर्फे उमेदवारी न देण्यामागे कारण होतं,” निकालानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया
त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलचं तापलेलं दिसून आलं. त्यातच आज जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, होय मी हिंदू आहे, मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. पण मी १०००००००००००% मनुवादीसनातन धर्माच्या विरोधात आहे. ज्याने वर्णव्यवस्था निर्माण केली, स्त्री जातीला टाकाऊ दर्जा दिला. माणसाला जनावरापेक्षा वाईट वागणुक दिली. छत्रपतींनी क्षुद्र म्हणून हिणवले. तुकारामाचा छळ केला. असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी कालच्या घटनेचा निषेध व्यक्त केला.
होय मी हिंदू आहे
मला कुणाच्या सर्टिफिकेट ची गरज नाही.
पण मी १०००००००००००% मनुवादीसनातन धर्माच्या विरोधात आहे ज्याने वर्णव्यवस्था निर्माण केली,स्त्री जातीला टाकाऊ दर्जा दिलामाणसाला जनावरा पेक्षा वाईट वागणूक दिली
छत्रपतींना क्षुद्र म्हणून हिणवले
तुकारामाचा छळ केला
धिक्कार !!! pic.twitter.com/a9ocZY4261— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 3, 2023
Read also
- हेही वाचा..“मला उमेदवारी दिली असती तर रवींद्र धंगेकरांसारखा विजयी झालो असतो”, राहुल कलाटेंची खदखद
- हेही वाचा..“संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी संजय राऊत, आदित्य ठाकरेंना अटक करा,” मनसे नेत्याची मागणी
- हेही वाचा..मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला… राज्यात एकच खळबळ, मनसैनिक आक्रमक
- हेही वाचा..“..तर देशाला बाहेर पडायलाही वेळ लागणार नाही”, धंगेकरांच्या विजयानंतर ठाकरेंची प्रतिक्रिया हेही वाचा..“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला