पुणे : अत्यंत चुरशीच्या लढाईत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या २८ वर्षाच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीच्या आधी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने आलेत. त्यावरूनच रवींद्र धंगेकरांनी एक सुचक विधान केलं आहे.
हेही वाचा..मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला… राज्यात एकच खळबळ, मनसैनिक आक्रमक
“कुरघोडीचं राजकारण, पोलीस यंत्रणा, निवडणुक यंत्रणा, गुंडांच्या मार्फत केलेला प्रचार किळसवाणा होता. मीही गिरीश बापटांविरोधात निवडणुक लढवली होती. पण त्यांनी कधी असं केलं नाही. यावेळी जिवाशी खेळण्यापर्यंत ही निवडणुक गेली. पोलिसांकडून दमदाटी करणं, गुंडांमार्फत धमकी देणं” असे प्रकार घडल्याचं धंगेकरांनी निकालानंतर सांगितले.
हेही वाचा..“..तर देशाला बाहेर पडायलाही वेळ लागणार नाही”, धंगेकरांच्या विजयानंतर ठाकरेंची प्रतिक्रिया
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी ज्या दिवशी फॉर्म भरला, त्याच दिवशी सांगितलं की माझा विजय नक्की आहे. करोडोंचा पाऊस पडल्यानंतरही जनतेनं ते पैसे स्विकाले नाहीत. शेवटी पैसा हरला आणि कार्यकर्ता जिंकला. जनशक्ती जिंकली आणि धनशक्ती हरली. माझ्या अनेक निवडणुका धनशक्ती विरूद्ध जनशक्ती अशा झाल्यात असंही धंगेकर म्हणाले.
हेही वाचा..“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकाचा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे. माजी खासदार संजय काकडे यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून माझ्यावर पक्ष जो काही कारवाई करेल. तो मला मान्य असल्याचं काकडे यांनी सांगितलं आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप पुण्यातील पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं पदही आता धोक्यात आलं आहे.
Read also
- हेही वाचा..“कसब्याचा पराभव भाजपच्या जिव्हारी, पुणे भाजपात भुकंप होण्याच्या हालचाली सुरू”?
- हेही वाचा..सतेज पाटलांकडे काॅंग्रेसने दिली मोठी जबाबदारी, विधानभवनात सत्ताधाऱ्यांना वेठीस आणणार ?
- हेही वाचा..“होय मी हिंदू, पण मी १०००००००००००% मनुवादीसनातन धर्माच्या विरोधात,” जितेंद्र आव्हाड
- हेही वाचा..“मला उमेदवारी दिली असती तर रवींद्र धंगेकरांसारखा विजयी झालो असतो”, राहुल कलाटेंची खदखद
- हेही वाचा..“संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी संजय राऊत, आदित्य ठाकरेंना अटक करा,” मनसे नेत्याची मागणी