पुणे : कसबा पोटनिवडणुकाचा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे. माजी खासदार संजय काकडे यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून माझ्यावर पक्ष जो काही कारवाई करेल. तो मला मान्य असल्याचं काकडे यांनी सांगितलं आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप पुण्यातील पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं पदही आता धोक्यात आलं आहे.
हेही वाचा..“..तर देशाला बाहेर पडायलाही वेळ लागणार नाही”, धंगेकरांच्या विजयानंतर ठाकरेंची प्रतिक्रिया
आधी अमरावती पदवीधर, नागपुर शिक्षक मतदारसंघ आणि आता कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून मोठ्या निवडणुकीत झालेले हे पराभव धक्कादायक आहेत. चंद्रकांत पाटील यांना पुणे आंदण दिल्यापासून बिघडलेली समीकरणे अजूनही सुधारलेली नाहीत. मुख्यमंत्री ए कनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रासनेंच्या विजयासाठी खुप फंडे वापरले, पण ते थंड पडले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काॅंग्रेसचे दिग्गज नेते पुण्यात तळ ठोकून राहिले. शरद पवारांनी विविध प्रकारची रसद पुरविली. आदित्य ठाकरेंनीही सभा घेतली. त्यामुळे धंगेकरांना यामुळे बळ मिळाले.
हेही वाचा..“मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात रोड शो केलेत, पण..” अजित पवारांचा खोचक टोला
यात भाजपच्या राज्यातील सर्व शहर, जिल्हा संघटनांमध्ये तातडीने बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कसबा पेठ निवडणुकीत झालेल्या चुका, धोरणात्मक निर्णय, संघटनेतील अंतर्गत वाद, अशा अनेक घटकांचा उहापोह या अहवालात करण्यात येणार आहे. त्यानुसार कसब्यात मदत न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचीही विशेष दखल घेतली जाणार आहे.
Read also
- हेही वाचा..सतेज पाटलांकडे काॅंग्रेसने दिली मोठी जबाबदारी, विधानभवनात सत्ताधाऱ्यांना वेठीस आणणार ?
- हेही वाचा..“होय मी हिंदू, पण मी १०००००००००००% मनुवादीसनातन धर्माच्या विरोधात,” जितेंद्र आव्हाड
- हेही वाचा..“मला उमेदवारी दिली असती तर रवींद्र धंगेकरांसारखा विजयी झालो असतो”, राहुल कलाटेंची खदखद
- हेही वाचा..“संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी संजय राऊत, आदित्य ठाकरेंना अटक करा,” मनसे नेत्याची मागणी
- हेही वाचा..मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला… राज्यात एकच खळबळ, मनसैनिक आक्रमक