पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांनी जवळपास ३६ हजार 168 मताधिक्यांनी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत बाजी मारली. परंतु या निवडणुकीत राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त झाले आहेत. राहुल कलाटे यांनी शिट्टी या निवडणुक चिन्हावर निवडणुक लढविली होती.
हेही वाचा..सतेज पाटलांकडे काॅंग्रेसने दिली मोठी जबाबदारी, विधानभवनात सत्ताधाऱ्यांना वेठीस आणणार ?
चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना १,३५,६०३ मतं पडली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९,४३५ मतं पडली आहेत. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मतं मिळाली आहेत.
हेही वाचा..“होय मी हिंदू, पण मी १०००००००००००% मनुवादीसनातन धर्माच्या विरोधात,” जितेंद्र आव्हाड
निवडणुकी आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र चिंचवडच्या पोटनिवडणुकीत झालेल्या मतमोजणीमध्ये राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली आहेत. मतदार संघातंमध्ये २ लाख ८७ हजार मतदान झाले. यापैकी ४७ हजार ८३३ मते कोणत्याही उमेदवाराला मिळणे आवश्यक होते. मात्र कलाटे यांना ४७ हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. ही मते न मिळाल्यामुळे कलाटे यांच्यासह २८ पैकी २६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
Read also
- हेही वाचा..“माणसं नसतांना, फेसबुक लाईव्ह असतांना, चहापाणी कसा झाला?” अजित पवारांना उत्तर शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
- हेही वाचा..पोलीस भरतीचा तो मुद्दा अजित पवारांनी सभागृहात मांडला, राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी
- हेही वाचा..“छी..छी.. त्यावर कोण बोलणार?” नितेश राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
- हेही वाचा..“मी ही बापटांविरोधात निवडणुक लढवली होती, पण त्यांनी कधी असं केलं नाही”,रवींद्र धंगेकरांचं विधान
- हेही वाचा..“कसब्याचा पराभव भाजपच्या जिव्हारी, पुणे भाजपात भुकंप होण्याच्या हालचाली सुरू”?