मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या वादळी स्वरूपात सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातच आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर चार जणांनी शिवाजी पार्कवर हल्ला केला. या हल्ल्याचा आरोप मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“मी ही बापटांविरोधात निवडणुक लढवली होती, पण त्यांनी कधी असं केलं नाही”,रवींद्र धंगेकरांचं विधान
“रोज उठून आदित्य ठाकरेंना शिव्या द्या. उद्धव ठाकरेंची एक्टींग करून प्रसिद्धी मिळावा. त्यांना आता समजलं पाहिजे की, अशा शिव्या देऊन पक्ष काही वाढत नसतं. त्यामुळे त्यांनी कामाला लागा आणि लोकांची सेवा करा.” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी मनसेंनी केलेल्या आरोपांवर दिली. तसेच मनसेला त्यांनी भाजपची ढ टीम देखील यावेळी संबोधलं.
हेही वाचा..“कसब्याचा पराभव भाजपच्या जिव्हारी, पुणे भाजपात भुकंप होण्याच्या हालचाली सुरू”?
भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेत पुन्हा एकदा संदीप देशपांडे यांच्या हल्लावरून दिशा सालीयन प्रकरणावर भाष्य करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. तसेच छी.. छी.. त्यावर कोण बोलणार असं म्हणत त्यांनी नितेश राणेंना चांगलाच टोला लगावला.
Read also
- हेही वाचा..“रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला,” एसटी कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानंतर अजित पवारांचा संताप
- हेही वाचा..‘शिट्टी ‘ने घड्याळाचे काटे बंद केले, पण राहुल कलाटे डिपॉझिट वाचू शकले नाहीत, वाचा सविस्तर
- हेही वाचा..“माणसं नसतांना, फेसबुक लाईव्ह असतांना, चहापाणी कसा झाला?” अजित पवारांना उत्तर शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
- हेही वाचा..पोलीस भरतीचा तो मुद्दा अजित पवारांनी सभागृहात मांडला, राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी
- हेही वाचा..“छी..छी.. त्यावर कोण बोलणार?” नितेश राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया