मुंबई : राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाला गळती लागली आहे. अशातच आता भाजपाचे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शशिकांत मोरे यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले. यावेळी राऊतांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यादरम्यान, आमदार सुनिल राऊत, मुंबई बँकेचे संचालक तसेच मुंबई जिल्हा उपनगर को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष अभिषेक घोसाळकर उपस्थित होते.
“महाराष्ट्र केंद्रशासित करा आणि केंद्राला चालवायला द्या”; प्रीतम मुंडे कडाडल्या
या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपामध्ये फूट निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आश्वासनावर मोरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतू दिवसेंदिवस वाढणारी महागाई पाहून जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे. विरोधकांना बदनाम करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचाही गैरवापर केला जात आहे, असा आरोप करत केवळ शिवसेनाच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देईल, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे.
पवारांसोबतची दोन तास बैठक; ST संपाबाबत काय झाला निर्णय?; राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती
मोरे हे मुंबई जिल्हा उपनगर को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालकपदी कार्यरत आहेत. भाजपामध्ये काम करताना त्यांनी यापूर्वी रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने यांचे जनसंपर्क अधिकारीपद भूषवले होते.
Read Also :
- ‘तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो’; अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
- रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुरेश लाड यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
- शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती – शरद पवार
- देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब?
- मुख्यमंत्रिपदाची तात्पुरते सूत्रे कुणाच्या हाती? अजित पवार की एकनाथ शिंदे?