पुणे : अजित पवारांनी शरद पवार यांना सोडून वेगळी वाट धरली. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका पुतण्याचं राजकारण चव्हाट्यावर आले. परंतु राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात फुट पडली, पण याचा परिणाम म्हणून पवार कुटुंबात देखील मोठी दरी निर्माण झाली. त्याला महत्वाचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसापासून अजित पवार सातत्याने शरद पवारांबाबत वक्तव्य करीत आहेत. बारामतीत मतदारांना अजित पवारांनी अलिकडे भावनिक साद देखील घातलीय. यातच आता अजित पवारांचा सख्या पुतण्या शरद पवार गटात दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा…“गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”, अन् म्हणे मंत्री, नारायण राणेंचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजितदादांनी जोरदार रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. यातच बारामतीच्या मेळाव्यात मी आणि माझा परिवार सोडून पवार कुटुंबातील सगळेच जण मला विरोध करतील. कुणी भावनिक करतील, परंतु तुम्ही विकासाला मत द्या आणि आमचा उमेदवार निवडून आणा. असे आवाहन अजित पवारांनी केलं होतं. त्यातच आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे बारामतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या शहरात कार्यालायता आज सकाळी साडे दहा वाजता हजर राहणार आहेत. शरद पवार यांचे हात देशात बळकट करण्यासाठी मायबाप जनतेच आशीर्वाद हवा आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी युगेंद्र पवार आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. असे युगेंद्र पवार यांच्याकडून म्हणण्यात आलं आहे.
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला विरोध का ? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार
दरम्यान, बारामती शरयु फाऊंडेशनच्या वतीने ११ फेब्रवारी रोजी हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे तसेच बॉक्सिंगपटू मेरी कोम यांनी हजेरी लावली होती. अजित पवार यांची भावजय शर्मिला पवार यांनी बारामती हाफ मॅरेथनाचं आयोजन केलं होतं. यंदाचं हे दुसरे वर्ष आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगे पाटील आमदारांना आईवरून शिवीगाळ करतात,” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल
हेही वाचा…“४२ वर्षापासूनचा लढा यशस्वी..!” कोर्टातही मराठा आरक्षण टिकणार, महेश लांडगे यांचा विश्वास
हेही वाचा…“आता जाहिराती निघतील, मंजुर झालेलं आरक्षण लागू होणार का ?” देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारची नौटंकी”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले पहिल्यांदाच आभार म्हणाले, “ज्या निर्दयीपणाने डोकी फोडली..”