मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मांडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधेयक मांडल्यानंतर त्याला दोन्ही सभागृहात एकमताने मंजूरी देण्यात आली. यातच आता मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी….! मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात नेमकं काय म्हणाले ?
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचा कायदा पास झाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी जाहिराती निघतील तेथे मराठा समाजासाठी आरक्षण लागू होईल. असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकराने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मांडले आहे. दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…जागावाटपाबाबत आघाडीची बैठक, ‘त्या’ १४ ते १६ जागांबाबतचा तिढा सुटणार का ?
दरम्यान, अजित पवार यांना बाहेर जायचे होते. त्यामुळे ते उपस्थित नव्हते. दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आम्ही सभागृहात ठेवला होता. दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही. विरोधी पक्षाचे काम विरोध करणे आहे. आम्ही कायदा आणला तेव्हा त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारची नौटंकी”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले पहिल्यांदाच आभार म्हणाले, “ज्या निर्दयीपणाने डोकी फोडली..”
हेही वाचा…“गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”, अन् म्हणे मंत्री, नारायण राणेंचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला विरोध का ? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका..!!” शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं