नवी दिल्ली : केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासात त्यांचा उडालेला गोंधळ असो, रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्याबाबतची बातमी, चिपळूनमध्ये घडलेला हिंसाचार, अशा विविध कारणांमुळे चर्चेत आले आहेत. यातच आता त्यांचा एक आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास कोर्टात खेचणार, ओबीसी नेते आक्रमक, ” राजकारण पुन्हा तापणार
CIBIL score मुळे नॅशनॅलाईजेड बॅंक प्रकरणं रिजेक्ट करतात. यासंदर्भात पत्रकारांनी नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. परंतु सिबिल स्कोर म्हणजे काय हेच नारायण राणे यांना आठवेना. त्यामुळे राणेंनीच सिबीय स्कोर म्हणजे काय असा प्रतिप्रश्न केला. त्यावर राणे गोंधळले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ ट्विट करून महाराष्ट्र कॉंग्रेसने नारायण राणे यांना डिवचलं आहे.
गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ, अशी मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची अवस्था आहे. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या या महान व्यक्तीच्या गावी सिबील स्कोर सारखी सुक्ष्म गोष्ट देखील माहीत नाही. यावरूनच मोदी राजवटीत गल्ती ते दिल्ली एकंदरित सगळा आनंदी आनंद आहे हेच दिसून येते. असा जोरदार टोला राणेंना लगावला आहे.
हेही वाचा…विशेष अधिवेशनापुर्वीच जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले, म्हणाले, उद्याच आंदोलनाची दिशा…
दरम्यान, नारायण राणे यांचा हा व्हिडीओ सामाजिक कार्यकर्त्या अंजेली दमानिया यांनी देखील ट्विट केला आहे. त्यात त्यांनी हे आपले महा विद्वान MSME मंत्री ! भाईसाहेबांना CIBIL score म्हणजे काय हे माहित नाही. CIBIL score / Credit worthiness चांगलं होण्यासाठी जवळ जवळ ३६ महिने लागतात. सूक्ष्म आणि छोट्या कंपन्यांना हे जड जात. त्यांना मंत्र्यांनी काही उपाययोजना करावी म्हणून पत्रकरांनी प्रश्न विचारला होता . प्रश्न : CIBIL score मुळे नॅशनॅलाइजेड बँक प्रकरणं रिजेक्ट करतात. त्यावर भन्नाट उत्तर MSME म्हणजे काय हे तरी ह्यांना माहित आहे का ? मंत्री आहेत म्हणे. असा शाब्दिक टोला लगावला आहे.
“गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”… अशी मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची अवस्था आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या या महान व्यक्तीच्या गावी “सिबिल स्कोर” सारखी सूक्ष्म गोष्ट देखील नाही, यावरूनच मोदी राजवटीत गल्ली ते दिल्ली एकंदरीत सगळा आनंदी आनंद आहे हेच… pic.twitter.com/mfczeZKDPU
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 20, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला विरोध का ? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका..!!” शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं
हेही वाचा…मोठी बातमी….! मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात नेमकं काय म्हणाले ?
हेही वाचा…जागावाटपाबाबत आघाडीची बैठक, ‘त्या’ १४ ते १६ जागांबाबतचा तिढा सुटणार का ?
हेही वाचा….कॉंग्रेसचे १२ खासदार, ४० आमदार भाजपच्या वाटेवर ? 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य, जिंकण्यासाठी काहीपण..!