मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून विशेष अधिवेशन सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारने मसुदा देखील तयार केला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आम्हाला १० टक्के आरक्षण नकोय तर ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावे, तसेच या अधिवेशनात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम राहिले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही सगळ्यांना कोर्टात खेचणार असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाला कोर्टाचा मोठा दिलासा, तर अजित पवार गटाला सुनावले खडेबोल, कोर्टात नेमकं काय झालं?
आता पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता तीन अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार अशी माहिती समोर येत आहे. कायद्याचा आधार घेऊन टिकणारं आरक्षण देऊ असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असेही सांगण्यात येतय. परंतु राज्य सरकारने तयार केलेला मसुदा अद्यापही कोणाकडही आलेला नाहीय. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. परंतु त्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास आम्ही सगळ्यांना कोर्टात खेचणार असा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.
हेही वाचा…धक्कादायक…! “शांतताप्रिय पुणे शहारात गुंडगिरीचा थैमान, जिंवत महिलेला पेट्रोल टाकून झाळले,”
राज्य सरकारने ओबीसी समाजालावर अन्याय केला तर त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अडचण येईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवत असाल तर ओबीसी समाजाला आरक्षण द्यायला का अधिवेशन बोलवलं जात नाही. आजच्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचा प्रस्ताव का घेतला जात नाही. असा सवाल देखील त्यांनी केलाय. तसेच मागासवर्गीय आयोग हा टोटल स्क्रॅम असून फिक्सिंग झाली आहे. या अयोगातून अनेकांना काढून टाकण्यात आलं असून मला अहवाल वाचू द्या मग मी त्यावर सहीकरतो म्हणून मेश्राम या सदस्यांना काढून टाकण्यात आलं. दहा-बारा दिवसात कोट्यावधी मराठ्यांचे सर्वेक्षण करणं हे ऐतिहासिक गोष्ट असल्याचे सांगत सत्य आहे की बोगस आहे लवकरच उघडकीस येणार असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…विशेष अधिवेशनापुर्वीच जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले, म्हणाले, उद्याच आंदोलनाची दिशा…
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा अखेर सुर्य उगवला..! “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मंजुर
हेही वाचा…“राज्यसभेतून पत्ता कट, लोकसभेला इच्छूक नाही,” नारायण राणेंच्या मनात नेमकं काय ?
हेही वाचा.चंद्रपुर लोकसभेत वडेट्टीवार विरूद्ध मुनगंटीवार यांच्यात होणार सामना ? निवडणुक लढण्याचे दिले संकेत
हेही वाचा“आमचा पक्ष फुटला आहे, आता…,” जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य