पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येत आहे. शहरातील अनेक परिसरात कोयता गॅंगेने धुमाकुळ घातला आहे. यावर पोलिस अद्यापही कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही. येरवडा, लोहगाव, परिसरात कोयते मिरवत दहशत माजविण्याचा प्रकार ताजा असलताना आता पुन्ह एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खराडी परिसरात पार्किंगच्या वादावरून एका महिलेला जिवंत झाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी गृहमंत्र्यांवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा..शरद पवारांची बाजू घेणाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी ? बारामतीत नेमकं चाललंय काय ?
पुण्यातील चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार खराडी भागात घडला आहे. आरोपींनी गाडी पार्क करण्याच्या कारणावरून फिर्यादीच्या चारचाकी नेक्सॉन गाडीच्या समोरील व साईडच्या काचा लाकडी दांडक्याने फोडल्या. या गाडीच्या पुढील सिटवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली आहे. त्याचवेळी फिर्यांदींची भाडेकरू असणाऱ्या वर्षा दयाराम गायकवाड या घरातून बाहेर आल्या असता. त्यांच्या अंगावर देखील पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. कोणी मध्ये आला तर तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत आरोपी धिरज सपाटे फरार झाला. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा…“त्या काळात मोठी चुक झाली,” मंडल आयोगाचा उल्लेख करत खासदार उदयनराजे भडकले..
दरम्यान, याघटनेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, पुण्यात आज पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा व्हिडीयो समोर आला आहे. कधीकाळी शांतताप्रिय असणाऱ्या या शहरात आज गुंडगिरीने थैमान घातलेले आहे. पोलिस प्रशासनाचा धाक संपल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करते की, पुण्यातील या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दोषींना त्वरीत अटक करावी.
पुण्यात आज पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा व्हिडीयो समोर आला आहे. कधीकाळी शांतताप्रिय असणाऱ्या या शहरात आज गुंडगिरीने थैमान घातलेले आहे. पोलिस प्रशासनाचा धाक संपल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मी माननीय गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस @Dev_Fadnavis… https://t.co/IPM5mH40Sv
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) February 19, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन घेऊन काहीच होणार नाही”, राज ठाकरेंचं रोखठोक मत
हेही वाचातुम्हीही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? भाजपप्रवेशाबाबत जयंत पाटलांनी सोडलं मौन.. म्हणाले…
हेही वाचा…शिंदे गटातील खासदार थोडक्यात बचावले, दिल्लीत झालेल्या अपघातात गाडीचं मोठं नुकसान
हेही वाचा…लोकसभेच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की…
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजप मनसे युती होणार ? पडद्यामागून हालचाली वाढल्या