चंद्रपुर : आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी कॉंग्रेसच्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी कॉंग्रेसचा हात सोडला आहे. यातच अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी, तसेच मिलिंद देवरा या महत्वाच्या नेत्यांनी नेमकी निवडणुकीच्या पुर्वीच कॉंग्रेसचा राजीनामा देऊन अन्य पक्षात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपात येणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
हेही वाचा…ठरलं तर मग..! गिरीश बापट यांच्यानंतर ‘पुण्याचा कारभारी’ मोहोळ होणार? राजकीय गणितं काय सांगतात ?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवार चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणुक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याआधीच बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सध्या ताकदीने कॉंग्रेसची बाजू मांडत आहेत. परंतु अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकींप्रमाणे वडेट्टीवारही लवकरच भाजपात जातील अशा अफवा पसरल्या आहेत. त्यावर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाला साध देण्यासाठी जे लोक भाजपात येणार असतील त्यांच्यासाठी भाजपचा दुपट्टा तयार आहे. परंतु विजय वडेट्टीवार यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…अजितदादांचं सुप्रिया सुळेंना चॅलेंज..! सुप्रिया सुळे म्हणाल्या की,.. माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर..,
दरम्यान, भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील वडेट्टीवारांच्या प्रवेशाबाबत संकेत दिले आहेत. एका टिकेला प्रत्युत्तर देतांना आपण खरा हिंदुत्वादी आहेत आणि आमचे तुम्ही जुने सहकारी पण आहेत. काय माहित तुमचा आणि आमचा बॉस लवकरच एकच असेल. असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजप मनसे युती होणार ? पडद्यामागून हालचाली वाढल्या
हेही वाचा..शरद पवारांची बाजू घेणाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी ? बारामतीत नेमकं चाललंय काय ?
हेही वाचा…“त्या काळात मोठी चुक झाली,” मंडल आयोगाचा उल्लेख करत खासदार उदयनराजे भडकले..
हेही वाचा…“तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल”, कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…शरद पवारांना धक्क्यावर धक्के, सात आमदारांच्या अपात्रतेची ‘ती’ याचिका फेटाळली