नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नागालॅंड येथील अजित पवार गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सात आमदारांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हेमंत टकले यांनी ३० ऑगस्ट रोजी २०२३ रोजी ही याचिका दाखल केली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष शेरिंगेम लोंगकुमे यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.
हेही वाचा…लोकसभेपुर्वी कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के, कॉंग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर
राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर नागालॅंड येथील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर शरद पवार गटातील राष्ट्रीय सरचिटणीस हेमंत टकले यांनी राष्ट्रवादीचे आमदार पिक्टो शोहे, पी.लॉन्गॉन, नम्नी नचांग, वाय. म्होनबेमो हमत्सो, तोईहो येप्थो, वाय मानखाओ कोन्याक आणि ए पोंगशी फोम यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. मात्र महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देत ही याचिका फेटाळून लावली आहे.
हेही वाचा…“धनगर समाजाला फसवलं तसं जरांगे पाटलांना देखील सरकार फसवतंय”
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित अपात्रतेची याचिका त्यांच्या न्यायालयात पाच महिन्यांहून अधिक काळापासून प्रलंबित आहे. लोंगकुमार यांनी दहाव्या अनुसुचीच्या पॅरा ए चा हवाला देऊन सांगितले की, सात आमदारांना अपात्र ठरवण्यात येणार नाही. राष्ट्रवादीतील निवडणूक चिन्हावरील वादावर निवडणूक आयोगाने ६ फेब्रवारीला निर्णय दिला. तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागालॅंडचे अध्यक्ष वांथुंगो ओड्यू यांनी सभापती कार्यालयात उपलब्ध करून दिला. निवडणुक आयोगाचा निर्णय जर बघितला तर आमदारांविरूद्धची ही तक्रार आता राहिली नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवता येणार नाही. अशी प्रतिक्रिया लोंगकुमार यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठरलं तर मग..! गिरीश बापट यांच्यानंतर ‘पुण्याचा कारभारी’ मोहोळ होणार? राजकीय गणितं काय सांगतात ?
हेही वाचाअजितदादांचं सुप्रिया सुळेंना चॅलेंज..! सुप्रिया सुळे म्हणाल्या की,.. माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर..,
हेही वाचा“मोदींसोबत बैठक संपल्यानंतर दोन ग्लास पाणी, अन् घाम…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ ठाकरेंचा किस्सा
हेही वाचा“मिटकरींचे अनेक महिलांसोबत लफडी, व्हिडीओ पण…,मिटकरींनी जास्त वटवट करू नये, ” शरद पवार गटाचा इशारा
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट कोर्टात, येत्या १९ फेब्रुवारीला होणार महत्वाची सुनावणी