नवी दिल्ली : आगामी लोकसभा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के बसतांना दिसत आहेत. राज्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसचा हात सोडून हाती कमळ धरलं. यामुळे राज्यात कॉंग्रेसला मोठा फटका बसला आहे. यातच आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आज कमलनाथ दिल्तीत देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर देखील गळती सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
हेही वाचा…“माढा लोकसभा मतदारसंघ मला चांगलाच ठाऊक,” माढा मतदारसंघावर शरद पवारांनी ठोकला मोठा दावा
गेल्या काही दिवसापासून कमलनाथ कॉंग्रेसवर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशातच आता कमलनाथ यांचे सुपुत्र नकुलनाथ य़ांनी त्यांच्या सर्व समाजमाध्यमांवरील प्रोफाईलवरून कॉंग्रेससंबंधीची सर्व माहिती टवली आहे. या कृतीतून नकुलनाथ यांनी कॉंग्रेसला रामराम करणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. याच आज कमलनाथ दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ईडीची चौकशी लावा,” पन्नास खोकेंचा आरोपावरून रामदास कदम संतापले
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मध्यप्रदेशात केवळ एकच जागा जिंकता आली होती. कमलनाथ यांनी खुप मेहनत करून छिंदवाडा या मतदारसंघात त्यांचे पुत्र नकुलनाथ यांना जिंकवलं होतं. परंतु. अलिकडच्या काळात या मतदारसंघातील नकुलनाथ आणि कमलनाथ यांची लोकप्रियता घटल्याचं दिसून येत आहे. याचीच चिंता कमलनाथ यांना भासू लागल्याचे दिसून येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आज कमलनाथ आणि नकुलनाथ दोघेही दिल्लीत दाखल झाले असून. वरिष्ठांकडे आपला कॉंग्रेसला राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“धनगर समाजाला फसवलं तसं जरांगे पाटलांना देखील सरकार फसवतंय”
हेही वाचा…“ठाकरेंना ईडी लावायची सोडून द्या, राम कदमांनी बोलतांना तेवढा डोळ्याला झेंडुबाम नक्की लावावा”
हेही वाचा…“लोकांना फोन करून दमदाटी केली जाते, बारामतीत असं कधी घडलं नव्हतं”, शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…संसदरत्न पुरस्कार जाहीर..! महाराष्ट्रातील ‘या’ पाच खासदारांनी पटकवला पुरस्कार
हेही वाचा…पक्षाच्याच कार्यक्रमाला भावना गवळींना डावललं, भाजपच्या नेत्यांकडून ‘या’ नेत्याचं झालं जोरदार कौतूक