माढा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख नेत्यांनी मेळाव्यांच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकलं आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अजित पवार गटाने बारामती आणि थिरूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी सोलापुर आणि सातारा जिल्ह्याकडे लक्वळवले आहे. यातच आता माढा लोकसभा मतदारसंघात याआधी मी निवडणुक लढवली होती. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार दिला तर निश्चितच उमेदवार निवडून येईल असं म्हणत शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे.
हेही वाचा…कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्यात एका दगडात दोन लक्ष्य साधले, मोहोळांना संधी तर मुळीक अन् देवधरांना धक्का
माढा लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवार देणार का ? असा सवाल केला असता. त्यावर मी माढा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ मला चांगलाच ठाऊक आहे. तुम्ही सगळ्यांनी काम केले तर त्या मतदारसंघात अनुकूल निकाल होऊ शकतो. असे शरद पवारांनी बारामतीत म्हटले आहे. यामुळे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गट लढवणार असल्याचे सुचक संदेश शरद पवार यांनी दिले आहेत.
हेही वाचा…कोकणात भाजप अन् ठाकरे गट वाद शिगेला पोहचला, निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक, मोठा राडा
माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा विधानसभा, माढा विधानसभा, सांगोला विधानसभा, आणि सातारामधील फलटण विधानसभा मतदारसंघ आणि माण विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातच माळशिरस आणि माण विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर माढा आणि फलटण मध्ये राष्ट्रवादीचे तर सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तर फलटण विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून दिपक चव्हाण आमदार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी २००९ मध्ये निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत शरद पवारांनी भाजपचे उमेदवार सुभाष सुरेशचंद्र देशमुख आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचा तब्बल ५,३०,५९६ मत घेऊन पराभव केला होता. तर २०१४ मध्ये या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांना मिळाली. परंतु २०१९ च्या मोदी लाटेत ही जागा भाजपला गेली असून सध्या याठिकाणी भाजपचे रणजित नाईक-निंबाळकर म्हणून खासदार आहेत.
READ ALSO :
हेही वाचापक्ष गेलं, चिन्हं गेलं, शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर, म्हणाले….
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ईडीची चौकशी लावा,” पन्नास खोकेंचा आरोपावरून रामदास कदम संतापले
हेही वाचा…“भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा ?” निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ
हेही वाचा…लेकांचं दमदार भाषण ऐकून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…
हेही वा“जो काकाचा, बहिणींचा, काकींचा झाला नाही, तो काय होणार महाराष्ट्राचा ? आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं