बारामती : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह विधानसभा अध्यक्ष आणि निवडणुक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार गटाला याचा मोठा धक्का बसला आहे. यातच आता विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी यांसंदर्भात याचिका दाखल केली आहे. चिन्ह आणि पक्षनाव गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…कोकणात भाजप अन् ठाकरे गट वाद शिगेला पोहचला, निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक, मोठा राडा
शरद पवार बारामतीत पत्रकारांना म्हणाले की, पक्षातून लोक सोडून जातात, नवे येतात. या गोष्टी घडत असतात. मात्र असं कधी घडलेलं नाही की ज्याने पक्ष स्थापन केला. त्याचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर चिन्हही देऊन टाकलं. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल नीट लागेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा…“भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले “
दुसरं एक महत्वाचं तुम्हाला सांगतो, चिन्ह गेलं तरीही त्याची चिंता करायची नसते. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढलो आहे. त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्हं वेगवेगळी होती. पहिल्यांदा बैलजोडी होती. नंतर गाय-वासरू आलं. त्यानंतर चरखा हे चिन्ह आलं. त्यानंतर हाताचं चिन्ह आलं. त्यानंतर घड्याळ आलं. वेगळी चिन्हं आपल पाहिली आहेत. त्यामुळे कुणाला असं वाटत असेल की चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचं अस्तित्व संपेल तर असं घडत नसतं. सामान्य माणसांशी संपर्क वाढवला पाहिजे. त्यांना नवं चिन्ह काय आहे ? ते पोहचवलं पाहिजे. इतकंच महत्वाचं असतं. असेही शरद पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ईडीची चौकशी लावा,” पन्नास खोकेंचा आरोपावरून रामदास कदम संतापले
हेही वाचा…“भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा ?” निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ
हेही वाचा…लेकांचं दमदार भाषण ऐकून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…
हेही वा“जो काकाचा, बहिणींचा, काकींचा झाला नाही, तो काय होणार महाराष्ट्राचा ? आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्यात एका दगडात दोन लक्ष्य साधले, मोहोळांना संधी तर मुळीक अन् देवधरांना धक्का