कोल्हापुर : शिवसेना पक्ष चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर पक्षाचं पहिलं अधिवेशन कोल्हापुर येथे सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पहिला मेळावा होत असून या मेळाव्यातून अनेकांनी भाषणं केलीत. यातच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेयांनी दमदार भाषण केले. लेकांच दमदार भाषण पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या. तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्यातून देखील पाणी आलं.
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न,” शरद पवार गटाची कोर्टात धाव, निर्णय बदलणार ?
श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणातून बापाचं कौतुक केलं. बाळासाहेब गेल्यानंतर शिवसैनिकांचा आधार म्हणून माझा बाप झाला. मला वेळ न देता त्यांनी संपुर्ण महाराष्ट्राला आपला परिवार मानला. असं म्हणत श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या डोळ्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला. सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही,” चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
दरम्यान, शिवसेना राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या सत्रात अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मनोगते मांडली. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा.मनीषा कायंदे, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेली कामे आणि अपेक्षित सुधारणाबाबत मनोगत मांडले. तर माझा मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेतील माझी वाटचाल आपल्या ओघवत्या भाषणातून कथन केली. ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडले. असेही शिंदे म्हणाले.
‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात… https://t.co/fQTet7K5rG pic.twitter.com/bRH52jLOaK
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2024
सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले.
यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे… https://t.co/E5WkyNQFcU pic.twitter.com/rQxAGG965l
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2024
READ ALSO :
हेही वा“जो काकाचा, बहिणींचा, काकींचा झाला नाही, तो काय होणार महाराष्ट्राचा ? आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्यात एका दगडात दोन लक्ष्य साधले, मोहोळांना संधी तर मुळीक अन् देवधरांना धक्का
हेही वाचा…कोकणात भाजप अन् ठाकरे गट वाद शिगेला पोहचला, निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक, मोठा राडा
हेही वाचा…“भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले “
हेही वाचा…धनगर समाजाला कोर्टाचा मोठा धक्का, ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी फेटाळली