गुहागर-रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच कोकण दौरा केला. या दौऱ्याच्या वेळी आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता -पुत्रांवर जोरदार टिका केली. या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज भाजप नेते निलेश राणे यांची तळी येथे सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली. या सभेला जाण्याआधी निलेश राणे यांची गाडी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोर आली असता जोरदार दगडफेक करण्यात आली. यामुळे रत्नागिरीत सध्या ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आल्याने मोठा राडा बघायला मिळाला आहे.
हेही वाचा…“पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न, भयमुक्त पुण्यासाठी”, पुणे लोकसभेसाठी धंगेकर फिक्स? भाजपला घाम फुटणार ?
सभेच्या ठिकाणी जाण्याआधी निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेरून गाड्यांचा ताफा नेला. त्यावेळी निलेश राणे यांच्या गाड्यांवर जोरदार दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेक झाल्याने जमावाला बाजुला करण्यासाठी पोलिसांना अश्रु धारेंचा वापर करावा लागला. तर काही ठिकाणी मोठा राडा बघायला मिळाला.
हेही वाचा…राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने पक्षातीलच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं, कार्यकर्त्यांचा उघडपणे रोष
दरम्यान, कोकणात राणे आणि भास्कर जाधव हा वाद शिगेला पोहचला आहे. आपल्या जाहीर सभांमधून भास्कर जाधव राणे-पिता पुत्रांवर जोरदार टिका करतांना दिसत आहेत. तर अलिकडेच भास्कर जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यातच आज रत्नागिरीत दोन्ही गट आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ बघायला मिळाला. त्यामुळे रत्नागिरीत सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले “
हेही वाचा…धनगर समाजाला कोर्टाचा मोठा धक्का, ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी फेटाळली
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न,” शरद पवार गटाची कोर्टात धाव, निर्णय बदलणार ?
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही,” चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
हेही वाचा…अजिदादांनी बारामतीतून लोकसभेचं रणशिंग फुंकलं, सुप्रिया सुळेंना दिले मोठे आव्हान, म्हणाले..