पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. परंतु याठिकाणी अद्याप कोणतीही पोटनिवडणुक झाली नाही. यातच दोन महिन्यात आगामी लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अलिकडेच भाजपचा २५ वर्षाचा बालेकिल्ला कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी उद्धवस्त केला. त्याचा धाक अजूनही भाजपच्या मनात असल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून पुणे लोकसभेसाठी अनेक जण इच्छूक आहेत. तर महाविकास आघाडीने देखील याठिकाणी जय्यत तयारी केली आहे.
हेही वाचा…इम्तियाज जलील मुंबईतील ‘या’ लोकसभेतून निवडणूक लढवणार, एमआयएमच्या महत्वाच्या बैठकीत निर्णय
पुणे लोकसभेसाठी भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक आणि सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यातच रवींद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न, भयमुक्त पुण्यासाठी अशी सोशल मीडियावर जोरदार तयारी धंगेकरांकडून दिसून येत आहे.
दरम्यान, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने २५ वर्षाचा भाजपचा बालेकिल्ला उद्धवस्त केला. याठिकाणी रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. परंतु कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या भीतीमुळे भाजपने पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक घेतली नसल्याची चर्चा आहे.
हेही वाचा…“भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली”, चाकणकरांनी सुळेंना पुन्हा डिवचलं
यातच आता पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तसेच कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देणार असल्याचे बोललं जात आहे. रवींद्र धंगेकर यांनी देखील पुणे लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय परिस्थिती पाहता भाजपला रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात विजय मिळवणे फारच अवघड जाणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने पक्षातीलच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं, कार्यकर्त्यांचा उघडपणे रोष
हेही वाचा…राज्यसभेची उमेदवारी नाकारली, पण हर्षवर्धन पाटलांना भाजपात लागली मोठी लॉटरी, गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच
हेही वाचा…बारामतीत नणंद-भावजईच्या लढतीचे संकेत, सुनेत्रा पवारांच्या माहितीचा विकास रथ शहरात दाखल
हेही वाचा…“ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात…?” अजित पवार गटाच्या नेत्याची पार इज्जतच काढली, काका का वाद पेटला
हेही वाचा…जिल्हा परिषद, कारखाने, पंचायत समिती, आमदार, खासदार असे सर्वच त्यांच्याकडे, मग मराठा मागास कसा काय ? भुजबळांचा सवाल