पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर आता आगामी लोकसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे. कर्जत येथील मेलाव्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या चारही जागा लढविणार असल्याचे संकेत दिले होते. तर बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात देखील आम्ही उमेदवार देऊ असे अजित पवारांनी स्पष्ट केले होते. यातच आता अजित पवार गटाने बारामतीत आपला प्रचार करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…मोहोळ अन् देवधरांचा पत्ता कट होणार, भाजपने पुणे लोकसभेसाठी शोधला दुसराच उमेदवार
बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यातच आता भावी खासदार म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर बारामती शहरात झळकू लागले आहेत. तर यातच आता सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ आता शहरात फिरू लागला आहे. त्यामुळे बारातमी लोकसभा निवडणुकीत आता नणंद- भावजईच्या लढतीचे संकेत स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
हेही वाचा…तेव्हा मग दोन वर्ष काय अंडी उबवत होता का ? जितेंद्र आव्हाडांचा राहुल नार्वेकरांना संतापजनक सवाल
मागील काही वर्षापासून बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. अजित पवार महायुतीत येण्याआधी भाजपने मिशन बारामती देखील ठेवले होते. परंतु महायुतीत अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर भाजपने बारामतीपासून दुर जाण्याचं ठरवलं आहे.
यातच आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पवार कुटुंबातचा उमेदवार देण्यात यावा, असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळेच अजित पवार आता सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तेब करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात…?” अजित पवार गटाच्या नेत्याची पार इज्जतच काढली, काका का वाद पेटला
हेही वाचा…जिल्हा परिषद, कारखाने, पंचायत समिती, आमदार, खासदार असे सर्वच त्यांच्याकडे, मग मराठा मागास कसा काय ? भुजबळांचा सवाल
हेही वाचा…इम्तियाज जलील मुंबईतील ‘या’ लोकसभेतून निवडणूक लढवणार, एमआयएमच्या महत्वाच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…“भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली”, चाकणकरांनी सुळेंना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सुपुर्द