पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षनाव आणि चिन्ह तसेच विधीमंडळातील पक्ष हे दोन्ही निर्णय अजित पवारांच्या बाजूने लागले आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्ह आणि पक्षावर लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. यातच मागच्या लोकसभेच्या सर्व जागा अजित पवार गट लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसऱ्या बाजुला आता अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वाचनास सुरूवात, राज्यात आणखी एक मोठी घडमोड
अजित पवार गटातील नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मागील काही दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सातत्याने टिका करतांना दिसत आहेत. यातच आता त्यांच्या खासदारकीवरून रूपाली चाकणकर यांनी पुन्हा सुळेंना डिवचलं आहे. भाऊबीजेचे गिप्ट म्हणून अजिदादांकडून १५ वर्षांपासून मिळत असलेली खासदारकी जाण्याची लक्षणे दिसताच. भाऊ बीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“जरांगे पाटलांची तब्येत ढासळली, प्रकृती चिंताजनक..! मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावलं, दिले ‘हे’ आदेश “
तसेच पुढे त्यांनी अर्थाच भाऊबीज आणि भाऊबीजेमागे असलेली आपली संस्कृती ही मांसाहार करून मंदिरात पाया पडणाऱ्यांना समजली असेल का ही शकांच असल्याचे रूपाली चाकणकर म्हणाल्यात. यावरून आता शरद पवार गट रूपाली चाकणकर यांना काय प्रत्युत्तर देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाऊबीजेचे गिफ्ट म्हणून अजितदादांकडून १५ वर्षांपासून मिळत आलेली खासदारकी जाण्याची लक्षणे दिसताच, भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली आहे.
अर्थात भाऊबीज आणि भाऊबीजेमागे असलेली आपली संस्कृती ही मांसाहार करून मंदिरात पाया पडणाऱ्यांना समजली असेल का हि…— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 15, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सुपुर्द
हेही वाचा…मोहोळ अन् देवधरांचा पत्ता कट होणार, भाजपने पुणे लोकसभेसाठी शोधला दुसराच उमेदवार
हेही वाचा…तेव्हा मग दोन वर्ष काय अंडी उबवत होता का ? जितेंद्र आव्हाडांचा राहुल नार्वेकरांना संतापजनक सवाल
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण..! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच, शरद पवारांना मोठा धक्का
हेही वाचा….गिरीश महाजनांचा फोटो ट्विट, “तेव्हा बसेस फोडल्यात, आता विरोधक फोडताय ?” शरद पवार गटाचा हल्लाबोल