मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागासवर्ग आयोगाने अहवाल सोपवला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा एक मार्ग सोप्पा झाला आहे. तर या अहवालावर आता येत्या २० फेब्रुवारी रोजी सरकारच्या विशेष अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटलांची तब्येत ढासळली, प्रकृती चिंताजनक..! मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावलं, दिले ‘हे’ आदेश “
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपुर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ‘वर्षा’ निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपुर्द करतेवेळी आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते.
हेही वाचा…पक्ष काढलं, चिन्ह काढलं, तरीही निवडणुक लढवली आणि अन् १०१ जागा मिळवल्या, महाराष्ट्रातही बदल होईल का ?
यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, १९६७ पुर्वीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत. त्यांच्यासाठी वेगळा नियम आहे. आत्ताचं मराठा आरक्षण पुर्णपणे ज्यांच्या कोणत्याही नोंदी नाहीत. पुर्वी मराठा समाजाला जे आरक्षण दिलं होतं. त्यानुसार देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्र्याने स्पष्ट केले आहे. तसेच मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणला कोणताही धक्का लागणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुनरूच्चार केला. तसेच मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागसलेपणावर कायद्याच्या चौकटीवर टिकणारं आरक्षण मिळेल, असा विश्वसा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…मोहोळ अन् देवधरांचा पत्ता कट होणार, भाजपने पुणे लोकसभेसाठी शोधला दुसराच उमेदवार
हेही वाचा…तेव्हा मग दोन वर्ष काय अंडी उबवत होता का ? जितेंद्र आव्हाडांचा राहुल नार्वेकरांना संतापजनक सवाल
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण..! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच, शरद पवारांना मोठा धक्का
हेही वाचा….गिरीश महाजनांचा फोटो ट्विट, “तेव्हा बसेस फोडल्यात, आता विरोधक फोडताय ?” शरद पवार गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वाचनास सुरूवात, राज्यात आणखी एक मोठी घडमोड