मुंबई : पंतप्रधान पदावर असताना प्राणघातक हल्ला, त्यानंतर पंतप्रधान पदावरून हटवलं. परत न्यायालयातून थेट अटकेची कारवाई अन् जामीन त्यानंतर अनेक खटल्यांमध्ये शिक्षांवर शिक्षा, पक्ष काढलं, चिन्ह काढलं. तरीही निवडणुक लढवली आणि जिंकली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सध्या यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. इतकं होऊनही इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ चे समर्थन केलेल्या अपक्ष उमेदवारींनी १०१ जागा मिळवून बाजी मारली आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकप्रकारे भाजपला कडक इशाराच दिला आहे.
हेही वाचा…“..कारण पुतण्या गद्दार निघाला, २०१९ सारखी आता गद्दारांना माफी नाही,”
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि पक्षचिन्ह काढून घेण्याची पद्धत शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत अवलंबिली गेली आणि पाकिस्तानने महाराष्ट्राचे अनुकरण केले. वाईट वाटते की, ज्या पाकिस्तानमध्ये लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाली होती ; त्यांनी देखील महाराष्ट्राचेच अनुकरण केले होते. म्हणजेच, लोकशाही मूल्यांचे किती पायमल्ली झाली असेल याची कल्पना येते. पण, बघा काय होतंय; इम्रान खान यांचा पक्ष काढला, निशाणी काढली. अगदी त्याचे सर्वस्व काढून घेतले. पण, इम्रान खान यांचे १०१ उमेदवार बिना पक्षाचे अपक्ष म्हणून वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आले.
हेही वाचा….कुलकर्णी राज्यसभेवर गेल्याने भाजपचा राजकीय गुंता सुटला, पुणे लोकसभेसाठी भाजपचा ‘हा’ उमेदवार ठरला*
पाकिस्तानसारख्या अविवेकी विचार करणाऱ्या देशातही लोकशाहीची पाळेमुळे रूजली पाहिजेत, असे तेथील तरूण वर्गाला वाटू लागले आहे. पण, महाराष्ट्राचे अनुकरण पाकिस्तान करतेय, ही दुर्देवी बाब आहे. संत महात्म्यांचा, समाजसुधारकांचा, पुरोगामी विचारधारेचा प्रदेश म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. या प्रदेशाची अशी ओळख केली आहे की त्याचे अनुकरण आता पाकिस्तानही करतोय. पण, पाकिस्तानच्या जनतेने जे केलं त्याच्यापेक्षा अधिक कडवट उत्तर महाराष्ट्रातील जनता देईल. असा इशारा आव्हाडांनी दिला आहे.
महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि पक्षचिन्ह काढून घेण्याची पद्धत शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत अवलंबिली गेली आणि पाकिस्तानने महाराष्ट्राचे अनुकरण केले. वाईट वाटते की, ज्या पाकिस्तानमध्ये लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाली होती ; त्यांनीदेखील महाराष्ट्राचेच अनुकरण केले होते.…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 15, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“..तर नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीला पुर्णविराम लागणार? “
हेही वाचा….कॉंग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या, खर्गे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर, तातडीची बोलवली बैठक
हेही वाचा…राज्यसभेचा कार्यकाळ बाकी असतांना प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी का ? कारण आलं समोर
हेही वाचा.निवडणुकी आधी कोर्टाचा भाजपला जोरदार झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द
हेही वाचा…“चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात येणार”? अशोक चव्हाणांची ‘ती’ दुसरी अट भाजप मान्य करणार