मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज महाराष्ट्रातून महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा तर कॉंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु तीन वर्ष राज्यसभेचे बाकी असतांना अजित पवार गटाने प्रफुल पटेल यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा….ठाकरे गटाचे ‘हे’ माजी मंत्री शिंदे गटाच्या वाटेवर ? एकनाथ शिंदेंसोबत ती भेट अन्…
महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठवावयाच्या सहा सदस्यांसाठीची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजपने चौथा उमेदवार दिला नाही तर महाविकास आघाडीने देखील एकच उमेदवार दिला आहे. त्यामुळे निवडणुक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यातच राज्यसभा सदस्य असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देत पक्षाने धक्का दिला आहे.
प्रफुल्ल पटेलल यांचा सध्याचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ मे २०२७ मध्ये संपणार आहे. तरी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कारण राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते पक्षाचे असे एकटेच राज्यसभा सदस्य आहेत. जे अजित पवारांसोबत आहेत. अन्य सदस्य शरद पवार यांच्यासोबत आहेत. शरद पवार गटाने पटेल यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका राज्यसभा सभापतींकडे केलेली आहे. उद्या त्याचा निकाल आला व पटेल यांचे सदस्यत्व रद्द झाले तर त्यांना खासदारकी गमवावी लागेल, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“ठाकरे गटाचे काही नेते आमच्या संपर्कात, येत्या दोन ते तीन दिवसात…” कुणी केला मोठा दावा ?
अजित पवार गटाकडून बाबा सिद्दीकी, पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे पटेल यांना उमेदवारी देत आहोत असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर मला उमेदवारी दिल्याबद्दल मी अजित पवार व इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. मी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर दुसऱ्या कुणालातरी संधी मिळेल. आम्ही जे काही केलं, ते योग्यच आहे. त्यासाठी कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा.निवडणुकी आधी कोर्टाचा भाजपला जोरदार झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द
हेही वाचा…“चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात येणार”? अशोक चव्हाणांची ‘ती’ दुसरी अट भाजप मान्य करणार
हेही वाचा…“..कारण पुतण्या गद्दार निघाला, २०१९ सारखी आता गद्दारांना माफी नाही,”
हेही वाचा..*कुलकर्णी राज्यसभेवर गेल्याने भाजपचा राजकीय गुंता सुटला, पुणे लोकसभेसाठी भाजपचा ‘हा’ उमेदवार ठरला*
हेही वाचा..राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणाचा आज निकाल लागणार ? सगळ्यांची उत्सुकता पणाला