नांदेड : काल पक्षावर आरोप केले, आज प्रवेश केला आणि उद्या राज्यसभेची उमेदवारी मिळाली, असंच काहीसं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबतीच झालं. भाजपात येण्याआधी अशोक चव्हाण यांनी काही अटी ठेवल्या होत्या. त्यानुसार भाजपने अशोक चव्हाण यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला नांदेड येथील राजकीय हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. अशोक चव्हाण यांची पहिली अट मान्य केल्यानंतर आता दुसरी अट देखील मान्य करण्यात येणार असल्याची चर्चा नांदेडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना सरकारने फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”
माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाणांनी कॉंग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. यातच आता अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांनी देखील भाजप मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेडमधील भोकर विधानसभेतून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपात येण्याआधी अशोक चव्हाण यांनी ही अट ठेवली होती. त्यामुळे श्रीजया चव्हाण यांची भोकर विधानसभेतून उमेदवारी पक्की मानली जात आहे.
हेही वाचा…भाजपकडून आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच, कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या
गेल्या अनेक वर्षांपासून श्रीजया चव्हाण यांना अशोक चव्हाण राजकारणात सक्रीय करतांना दिसत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत देखील श्रीजया चव्हाण दिसल्या होत्या. यातच भावी आमदार म्हणून देखील याधी श्रीजया चव्हाण यांचे बॅनर झळकले आहेत. श्रीजया चव्हाण यांनी एलएलबीचं शिक्षण घेतले असून त्यांचं बालपण हे मुंबईत गेले आहे. त्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला देखील मैदानात उतरल्या होत्या. तसेच त्यांनी विधानसभेला भोकर मतदारसंघाचा सोशल मीडिया पुर्ण सांभाळला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसा आणि चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..कारण पुतण्या गद्दार निघाला, २०१९ सारखी आता गद्दारांना माफी नाही,”
हेही वाचा..*कुलकर्णी राज्यसभेवर गेल्याने भाजपचा राजकीय गुंता सुटला, पुणे लोकसभेसाठी भाजपचा ‘हा’ उमेदवार ठरला*
हेही वाचा..राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणाचा आज निकाल लागणार ? सगळ्यांची उत्सुकता पणाला
हेही वाचा..ठाकरे गटाचे ‘हे’ माजी मंत्री शिंदे गटाच्या वाटेवर ? एकनाथ शिंदेंसोबत ती भेट अन्…
हेही वाचा…“ठाकरे गटाचे काही नेते आमच्या संपर्कात, येत्या दोन ते तीन दिवसात…” कुणी केला मोठा दावा ?