मुंबई : निवडणुक रोखे योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. निनावी निवडणूक रोख्यांमुळे संविधानातील कलम १९ ( १ ) ( अ ) अंतर्गत असलेल्या माहितीच्या अधिकाराचे हनन होत असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्दबाबतल ठरवली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे.
हेही वाचा…“ठाकरे गटाचे काही नेते आमच्या संपर्कात, येत्या दोन ते तीन दिवसात…” कुणी केला मोठा दावा ?
इलेक्टोरल बॉंडबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत इलेक्टोर बॉं जारी करणं बॅंकांनी ताबडतोब थांबवावं. १२ एप्रिल २०१९ पासून आजवर किती बॉंड खरेदी करण्यात आले. याचा तपशील सीबीने निवडणुक आयोगाला द्यावा. १२ एप्रिल २०१९ पासून आजवर राजकीय पक्षांनी किती इलेक्ट्रोल बॉंड्सचं पैशात रूपांतर केले आहे, याचा तपशील त्यांनी द्यावेत. असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना सरकारने फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”
निकालापासून ३ आठवड्यांच्या आत ही माहिती देण्यात यावी, १३ मार्च २०१४ रोजी निवडणुक आयोग ही माहिती प्रसिद्ध करेल. ज्या इलेक्टोरल बॉंड्सची वैधता १५ दिवसांच्या आत आहेत. जे राजकीय पक्षांनी पैशांत रूपांतरित केलेले नाहीत. ते बॉंड्स पक्षांकडून खरेदीदाराला परत करण्यात यावेत. हे बॉंड्स जारी करणारी बंक सीबीआय हे पैसे परत करेल असेही कोर्टाने म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर सर्वात जास्त इलेक्टोल बॉंडच्या माध्यमातून भाजपला निधी मिळाला आहे. त्याच्या खालोखाल कॉंग्रेसला भाजपपेक्षा निम्म्या पेक्षा कमी निधी प्राप्त झाला आहे. यातच यामाध्यमातून काळा पैसा सफेत केला जाण्याची भीती कोर्टाने व्यक्त केली असून यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाचा आता विरोधकांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात येणार”? अशोक चव्हाणांची ‘ती’ दुसरी अट भाजप मान्य करणार
हेही वाचा…“..कारण पुतण्या गद्दार निघाला, २०१९ सारखी आता गद्दारांना माफी नाही,”
हेही वाचा..*कुलकर्णी राज्यसभेवर गेल्याने भाजपचा राजकीय गुंता सुटला, पुणे लोकसभेसाठी भाजपचा ‘हा’ उमेदवार ठरला*
हेही वाचा..राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणाचा आज निकाल लागणार ? सगळ्यांची उत्सुकता पणाला
हेही वाचा..ठाकरे गटाचे ‘हे’ माजी मंत्री शिंदे गटाच्या वाटेवर ? एकनाथ शिंदेंसोबत ती भेट अन्…