IMPIMP

इम्तियाज जलील मुंबईतील ‘या’ लोकसभेतून निवडणूक लढवणार, एमआयएमच्या महत्वाच्या बैठकीत निर्णय

Imtiaz Jalil to contest Lok Sabha from North Mumbai, decision in important meeting of MIM

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एमआयएमने देखील तयारी सुरू केली आहे. काल छत्रपती संभाजीनगर येथे मुंबईमधील एमआयएम कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली. तर या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर इत्मियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा….गिरीश महाजनांचा फोटो ट्विट, “तेव्हा बसेस फोडल्यात, आता विरोधक फोडताय ?” शरद पवार गटाचा हल्लाबोल 

राज्यात काहीच महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आता प्रत्येक पक्षांनी राज्यात राजकीय हालचाली वाढवल्या आहेत. यातच काल छ. संभाजीनगर येथे एमआयएमच्या कार्यकर्त्यांशी बैठक झाली. या बैठकीत इम्तियाज जलील यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढावं अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली. यावेळी एमआएम पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्याकडे देखील आपण मुंबईत लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच मुंबईतून लढावं की अन्य जागेवर याचा निर्णय आम्ही नंतर घेऊ असे खासदार जलील यांनी सांगितले.

हेही वाचाराष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वाचनास सुरूवात, राज्यात आणखी एक मोठी घडमोड 

दरम्यान,  यावेळी जलील म्हणाले की, जे लोक आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचे म्हणत होते. आता तेच लोक भाजपसोबत गेले आहेत. सुरूवातीपासून अशोक चव्हाण यांच्या सारखे लोक आरएस एसशी संबंधित आहेत. फक्त ते सेक्युलरीझमचा बुरखा ओढून ते लोकांचा राजकारणासाठी वापर करत आहेत आणि खेळ खेळत होते.

यातच छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही कोणताही उमेदवार दिला तरी तो निवडून येईल. त्यामुळे सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये एमआयएम पक्ष इतर ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मुंबीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक घेत आहेत. १८ फेब्रुवारीला ओवेसी यांची अकोल्यात सभा आहेत. त्यावेळी मतदारसंघाबाबत स्पष्ट निर्णय होईल असेही जलील म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा“भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली”, चाकणकरांनी सुळेंना पुन्हा डिवचलं

हेही वाचामराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सुपुर्द 

हेही वाचामोहोळ अन् देवधरांचा पत्ता कट होणार, भाजपने पुणे लोकसभेसाठी शोधला दुसराच उमेदवार 

हेही वाचा…तेव्हा मग दोन वर्ष काय अंडी उबवत होता का ? जितेंद्र आव्हाडांचा राहुल नार्वेकरांना संतापजनक सवाल 

हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण..! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच, शरद पवारांना मोठा धक्का 

Total
0
Shares
Previous Article
Chakankar came up with the fertile idea of ​​doing sister seeds instead of brother seeds.

"भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली", चाकणकरांनी सुळेंना पुन्हा डिवचलं

Next Article
Zilla Parishad, Factories, Panchayat Samiti, MLAs, MPs are all with them, then what about the Maratha backwardness

जिल्हा परिषद, कारखाने, पंचायत समिती, आमदार, खासदार असे सर्वच त्यांच्याकडे, मग मराठा मागास कसा काय ? भुजबळांचा सवाल

Related Posts
Total
0
Share