पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण जाले आहे. शिवसेनेप्रमाणे त्यांच्यात देखील राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह असा वाद पाहायला मिळत असून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टिका करतांना दिसत आहेत. यातच अलिकडेच अजित पवारांनी काका का असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून शरद पवार गटाकडून देखील काकाच का असं म्हणत पलटवार करण्यात आला. त्यात आता खासदार अमोल कोल्हे यांनी काटेवाडीपासून ते कारगिलपर्यंत महाराष्ट्रसमोर दिल्लीला झुकवायला काकाच हवा असतो, असं म्हणत कोल्हेंनी आपल्या कवितेतून अजित पवारांवर हल्लाबोल केला.
हेही वाचा…तेव्हा मग दोन वर्ष काय अंडी उबवत होता का ? जितेंद्र आव्हाडांचा राहुल नार्वेकरांना संतापजनक सवाल
अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर आपल्या काकाच का ? या कवितेतून हल्लाबोल केला आहे. सध्या ही कविता महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून निवडणुकीच्या तोंडावर संधी पाहून शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले अभिनेते अमोल कोल्हे हल्ली निष्ठेवर मार्गदर्शन करतात, असा टोला अजित पवार गटाचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी लगावला. त्यावर अमोल कोल्हेंसोबत सुरज चव्हाण जेवत असतांनाचा फोटो ट्विट करून महाशय ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात ? असं म्हणत पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुरज चव्हाण यांची हवाच काढली.
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण..! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच, शरद पवारांना मोठा धक्का
दरम्यान, एका कार्यक्रमात अजित पवारांनी सका पाटलांचं उदाहरण देत काका का ? असं म्हणत शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यानंतर मुंबईत झालेल्या मेळाव्यात शरद पवार गटातील नेत्यांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. तर अमोल कोल्हे यांनी कविता सादर करत अजित पवारांवर टिका केली. त्यावर आता पुन्हा अजित पवार गटातील नेते अमोल कोल्हे तसेच शरद पवार गटावर टिका करतांना दिसत आहेत.
महाशय….
ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात…? https://t.co/g6Rk770Wt2 pic.twitter.com/u1pYQ8xH31— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 16, 2024
READ ALSO :
हेही वाचा…जिल्हा परिषद, कारखाने, पंचायत समिती, आमदार, खासदार असे सर्वच त्यांच्याकडे, मग मराठा मागास कसा काय ? भुजबळांचा सवाल
हेही वाचा…इम्तियाज जलील मुंबईतील ‘या’ लोकसभेतून निवडणूक लढवणार, एमआयएमच्या महत्वाच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…“भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली”, चाकणकरांनी सुळेंना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सुपुर्द
हेही वाचा…मोहोळ अन् देवधरांचा पत्ता कट होणार, भाजपने पुणे लोकसभेसाठी शोधला दुसराच उमेदवार