मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु त्यांच्या जागी अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांची वर्णी लागली. त्यानंतर भाजपने हर्षवर्धन पाटलांवर अन्याय केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. परंतु यातच आज भाजपने हर्षवर्धन पाटलांना मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सुपुर्द
राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणुक घेण्यात आली. यामध्ये ही निवडणुक बिनविरोध होत हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेचे तिकीट नाकारल्यानंतर आता भाजपने हर्षवर्धन पाटलांचं पुन्हा राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. तर राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा…मोहोळ अन् देवधरांचा पत्ता कट होणार, भाजपने पुणे लोकसभेसाठी शोधला दुसराच उमेदवार
दरम्यान, गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच साखर संघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनवर्सन केल्याचं पाहायला मिळत आहे. उसाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठं यामुळे वर्चस्व प्राप्त झालं असून महाराष्ट्राला राष्टीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांची राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही महत्वाची प्रमुख संस्था आहे. देशातील साखर उद्योगाल मार्गदर्शन करणे, तसेच साखर उद्योगांपुढील अडचणी केंद्र सरकारकडून सोडवून घेण्याचे काम राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या माध्यमातून करण्यात येते.
READ ALSO :
हेही वाचा…बारामतीत नणंद-भावजईच्या लढतीचे संकेत, सुनेत्रा पवारांच्या माहितीचा विकास रथ शहरात दाखल
हेही वाचा…“ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात…?” अजित पवार गटाच्या नेत्याची पार इज्जतच काढली, काका का वाद पेटला
हेही वाचा…जिल्हा परिषद, कारखाने, पंचायत समिती, आमदार, खासदार असे सर्वच त्यांच्याकडे, मग मराठा मागास कसा काय ? भुजबळांचा सवाल
हेही वाचा…इम्तियाज जलील मुंबईतील ‘या’ लोकसभेतून निवडणूक लढवणार, एमआयएमच्या महत्वाच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…“भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली”, चाकणकरांनी सुळेंना पुन्हा डिवचलं