बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किमंत कमी होईल. त्यामुळे निवडणुकीला मतदान करतांना भावनिकपणे विचार करू नका. भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. काम ही तडफेनेच करावी लागतात. जोरकसपणे करावी लागतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला विक्रमी मतांनी निवडून दिले होते. तसेच आता आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून लीड मिळालं पाहिजे. असे म्हणत अजित पवार यांनी बारामतीच्या मेळाव्यातून लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे.
हेही वाचा…जिल्हा परिषद, कारखाने, पंचायत समिती, आमदार, खासदार असे सर्वच त्यांच्याकडे, मग मराठा मागास कसा काय ? भुजबळांचा सवाल
अजित पवारांनी यावेळी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील जोरदार घणाघात चढवला. पार्लामेंटमध्ये नुसती भाषणं करून कामं होत नाहीत. मी देखील भाषणं करून उत्तम संसदपट्टू म्हणून पुरस्कार मिळवला असता आणि इथे कामं केली नसती तर बारामतीमध्ये कामं होऊ शकली असती का ? काही जण सांगतील वर आम्हाला द्या, खालची निवडणुक आहे. त्यांना मतं द्या. पण माझ्या उमेदवाराला डाग लागला तर राज्यात तसेच देशात मला किमंत राहणार नाही. त्यामुळे आगामी काळात बारामतीचा विकास करायचा असेल तर महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. प्रत्येक उमेदवाराजवळ जा. त्यांना माझा शब्द असल्याचं सांगा. असेही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
हेही वाचा…इम्तियाज जलील मुंबईतील ‘या’ लोकसभेतून निवडणूक लढवणार, एमआयएमच्या महत्वाच्या बैठकीत निर्णय
दरम्यान, तसेच पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, मी आणि माझा परिवार सोडला तर बारामतीमध्ये पवार कुटुंबातील सर्वचजण माझ्याविरोधात प्रचार करतील. इतरांसाठी एवढं करून मला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी मला तुम्हा कार्यकर्त्यांची साथच आहे. तुमची साथ आहे. तोपर्यंतच मी तडफेने काम करू शकतो. असे भावनिक आवाहन देखील अजितदादांनी केले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून यापुर्वी निवडून गेलेल्या खासदारापेत्रा नवा खासदार जास्त काम करेल. हा अजित पवारांचा शब्द आहे हे जनतेला सांगा. मोदी की गॅरंटी या धर्तीवर अजित पवारांनी दिलेली ही गॅरंटी चर्चेची ठरली.
READ ALSO :
हेही वाचा…“पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न, भयमुक्त पुण्यासाठी”, पुणे लोकसभेसाठी धंगेकर फिक्स? भाजपला घाम फुटणार ?
हेही वाचा…राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने पक्षातीलच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं, कार्यकर्त्यांचा उघडपणे रोष
हेही वाचा…राज्यसभेची उमेदवारी नाकारली, पण हर्षवर्धन पाटलांना भाजपात लागली मोठी लॉटरी, गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच
हेही वाचा…बारामतीत नणंद-भावजईच्या लढतीचे संकेत, सुनेत्रा पवारांच्या माहितीचा विकास रथ शहरात दाखल
हेही वाचा…“ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात…?” अजित पवार गटाच्या नेत्याची पार इज्जतच काढली, काका का वाद पेटला