मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी. जे.अब्दुल कलाम यांच्या आग्रहाखात प्राईम फाऊंडेशन तर्फे दिला जाणार संसदरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश आहे. यावर्षी सात जानेवारीला या पुरस्कारांची घोषणा झाली होती. आज त्याचं वितरण करण्यात आले. राज्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटातीलदोन, शिवसेना शिंदे गटातील दोन तर भाजपच्या एका खासदाराला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
हेही वाचा…लेकांचं दमदार भाषण ऐकून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…
संसदेत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि लोकांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदाच्या या पुरस्करांच्या मानकरींची यादीत राज्यातील पाच खासदारांचा सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तसेच बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना शिंदे गटाचे मावचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भाजपच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार हिना गावित आणि कॉंग्रेसचे पश्चिम बंगालमधील बहरामपुर लोकसभा मतदारसंघाचे खाससदार अधीर रंजन चौधरी यांना संसद महारत्न पुरस्कार देण्यात आला आहे.
हेही वाचा…“जो काकाचा, बहिणींचा, काकींचा झाला नाही, तो काय होणार महाराष्ट्राचा ? आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं
संसदरत्न पुरस्कार शिंदे गटाचे कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, यांना देण्यात आला. तर भाजपचे नेते सुकांत मुजमदार आणि सुधीर गुप्ता यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर कॉंग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…पक्षाच्याच कार्यक्रमाला भावना गवळींना डावललं, भाजपच्या नेत्यांकडून ‘या’ नेत्याचं झालं जोरदार कौतूक
“माढा लोकसभा मतदारसंघ मला चांगलाच ठाऊक,” माढा मतदारसंघावर शरद पवारांनी ठोकला मोठा दावा
हेही वाचा…पक्ष गेलं, चिन्हं गेलं, शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर, म्हणाले….
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ईडीची चौकशी लावा,” पन्नास खोकेंचा आरोपावरून रामदास कदम संतापले
हेही वाचा…“भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा ?” निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ