कोल्हापुर : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण दिल्लीला गेले होते. ठाकरे कुटुंबातील गैरव्यवहार बाहेर येऊ लागल्यानंतर ही भेट झाली होती. तेव्हा बैठक संपल्यानंतर अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना बाहेर थांबवून उद्धव ठाकरे यांनी बंद दाराआड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. बाहेर आल्यानंतर तुम्हाला घाम आला, तुम्ही दोन ग्लास पाणी प्यायलात, हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापुर येथील महाअधिवेशनात सांगितले.
हेही वाचा…“लोकांना फोन करून दमदाटी केली जाते, बारामतीत असं कधी घडलं नव्हतं”, शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कोल्हापुर येथील महाअधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. यावेळी शिंदे म्हणाले की, आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह जेव्हा मिळाले. तेव्हा शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी रूपये मिळायला हवेत असे पत्र ठाकरेंनी आम्हाला पाठविले होते. यांना बाळासाहेबांचा विचार नको, पैसे हवे होते. मी त्यांना ५० कोटी रूपये देऊन टाकले. हे पैसे मागताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज पाहिजे होती. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…संसदरत्न पुरस्कार जाहीर..! महाराष्ट्रातील ‘या’ पाच खासदारांनी पटकवला पुरस्कार
दरम्यान, शिवसेना अशीच मोठी झाली नाही. रक्ताचे पाणी केले लोकांनी, घरावर तुळशीपत्र ठेवले. तुम्हाला आयत्या पिठावर रांगोळीही नीट मारता आली नाही. मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवण्याचं काम तुम्ही केले. असला कोणता पक्षप्रमुख असतो. जो नेत्यांचा पानउतारा करतो. कदमांचा मनोहर पंत करायचा होता. नारायण राणे, राज ठाकरे यांनी असे काय मागितलेले की त्यांचा तुम्हाला त्रास होत होता. असेही शिंदेंनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा“मिटकरींचे अनेक महिलांसोबत लफडी, व्हिडीओ पण…,मिटकरींनी जास्त वटवट करू नये, ” शरद पवार गटाचा इशारा
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट कोर्टात, येत्या १९ फेब्रुवारीला होणार महत्वाची सुनावणी
हेही वाचा…लोकसभेपुर्वी कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के, कॉंग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर
हेही वाचा…“धनगर समाजाला फसवलं तसं जरांगे पाटलांना देखील सरकार फसवतंय”
हेही वाचा…“ठाकरेंना ईडी लावायची सोडून द्या, राम कदमांनी बोलतांना तेवढा डोळ्याला झेंडुबाम नक्की लावावा”