मुंबई : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे. अजित पवार शरद पवारांवर सातत्याने टिका करतांना दिसत आहेत. तर त्याला जितेंद्र आव्हाड जोरदार पलटवार करत आहेत. तर आव्हाडांवर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी हल्लाबोल करतांना दिसत आहेत. यावर आता शरद पवार गटाचे नेते विलास लावंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…संसदरत्न पुरस्कार जाहीर..! महाराष्ट्रातील ‘या’ पाच खासदारांनी पटकवला पुरस्कार
शरद पवारांवर टिका केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी आव्हाडांवर टोलेबाजी केली. जितेंद्र आव्हाड चळवळीच्या नावाखाली भामटेगिरी करणारी व्यक्ती आहे. हा भामटा माणूस आहे. या माणसाला माझे आव्हान आहे की, जर तुमच्यात हिमंत असेल तर अजितदादांनी महाराष्ट्रासाठी काय केले. यावर एकदा खुली चर्चा होऊ द्या. असं आव्हान अमोल मिटकरी यांनी दिलं होतं. त्यावर विकास लवांटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
अमोल मिटकरीसारखा आमदार जो केवळ मिमिक्री करतो. काही वर्षापुर्वी तो पाच ते दहा हजार रूपये घेऊन शिवचरित्र सांगायचा. जो स्वत: ला शिवव्याख्याता म्हणतो. पण त्याला शिवछत्रपती नीट माहिती नाहीत. त्याला पुरोगामी विचार कळालेला नाही. कुठली तात्विक बैठक नाही, केवळ बाजारू विचारवंत म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख आहे. असा टोलाही विकास लवांडे यांनी लगावला.
हेही वाचा…पक्षाच्याच कार्यक्रमाला भावना गवळींना डावललं, भाजपच्या नेत्यांकडून ‘या’ नेत्याचं झालं जोरदार कौतूक
दरम्यान, ज्याला स्वत: ची ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही, जिल्हा परिषदेला त्याचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकांवर राहिला. केवळ अजित दादांची दिशाभूल करून तो आमदार बनला. त्याची अनेक लफडी आम्हाला माहिती आहेत. त्याचे व्हिडीओ आम्हाला माहिती आहेत. तो महिलांसोबत कसा वागतो? हेही आम्हाला माहिती आहे. त्यामुळे मिटकरींसारख्या बाजारू विचारवंताने आमदार जितेंद्र आव्हाडांवर टिका करू नये. असा इशारा देखील त्यांनी दिला.
READ ALSO :
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट कोर्टात, येत्या १९ फेब्रुवारीला होणार महत्वाची सुनावणी
हेही वाचा…लोकसभेपुर्वी कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के, कॉंग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर
हेही वाचा…“धनगर समाजाला फसवलं तसं जरांगे पाटलांना देखील सरकार फसवतंय”
हेही वाचा…“ठाकरेंना ईडी लावायची सोडून द्या, राम कदमांनी बोलतांना तेवढा डोळ्याला झेंडुबाम नक्की लावावा”
हेही वाचा…“लोकांना फोन करून दमदाटी केली जाते, बारामतीत असं कधी घडलं नव्हतं”, शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल