नागपुर : मागील काही महिन्यांपासून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे सातत्याने वादग्रस्त आणि चितावणीखोर वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यातच आता एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीसमोरच महिलांचा जाहीर अपमान केला आहे. तसेच त्यांनी कायदा व सुव्यवस्थेला देखील मोठं आवाहन दिलं आहे. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, तुम्ही कितीही व्हिडीओ काढा, फक्त बायकोला दाखवतील हे पोलीस, मी इकडे आलो तर तुम्हाला कायदा सुव्यवस्था सांभाळणं मुश्किल होईल, पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाही. असं जाहीर वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट कोर्टात, येत्या १९ फेब्रुवारीला होणार महत्वाची सुनावणी
त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा.. पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा ? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा…लोकसभेपुर्वी कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के, कॉंग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर
दरम्यान, कोणी केला महिलेंचा अपमान ? हिंदू भगिनी ना love जिहाद च्या नावाने फसवले जाते. तेव्हा तुम्ही कधी बोलताना दिसत नाही. विरोधी पक्ष नेता हा फक्त एका धर्मा च्या बाजुने बोलणारा नसतो. महाविकास आघाडीच्या काळात पोलिसांकडून वसुली करताना तुमच्या सरकारला पोलीसांची काळजी वाटली नाही का ? असो.. आपण original हिंदुत्वादी आहात..आणि आमचे जुने सहकारी पण.. काय माहीत तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल. असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी वडेट्टीवारांना दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा..
पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही.
महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का?
महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी… pic.twitter.com/AeOtSlz4y3
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 18, 2024
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांना धक्क्यावर धक्के, सात आमदारांच्या अपात्रतेची ‘ती’ याचिका फेटाळली
हेही वाचा…ठरलं तर मग..! गिरीश बापट यांच्यानंतर ‘पुण्याचा कारभारी’ मोहोळ होणार? राजकीय गणितं काय सांगतात ?
हेही वाचाअजितदादांचं सुप्रिया सुळेंना चॅलेंज..! सुप्रिया सुळे म्हणाल्या की,.. माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर..,
हेही वाचा“मोदींसोबत बैठक संपल्यानंतर दोन ग्लास पाणी, अन् घाम…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ ठाकरेंचा किस्सा
हेही वाचा“मिटकरींचे अनेक महिलांसोबत लफडी, व्हिडीओ पण…,मिटकरींनी जास्त वटवट करू नये, ” शरद पवार गटाचा इशारा