चंद्रपुर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच नेत्यांनी आपापल्या मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांनी चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील खासदार थोडक्यात बचावले, दिल्लीत झालेल्या अपघातात गाडीचं मोठं नुकसान
विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुर लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने संधी दिली तर आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे. पण या प्रकरणी पक्ष घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असे त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे. यापुर्वीच दिवंगत कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी देखील चंद्रपुर लोकसभेची उमेदवारी मागितली आहे. त्यातच आता वडेट्टीवार यानी ही जागा लढवण्याचे संकेत दिल्याने कॉंग्रसपुढे येथून कुणाला उमेदवारी द्यायची? असा सवाल उभा ठाकला आहे.
हेही वाचा…लोकसभेच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की…
दरम्यान, चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून वडेट्टीवारांची चर्चा केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीत मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपुर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजत आहेत. त्यामुळे दुसऱ्या बाजूला वडेट्टीवार उभे राहिले तर मुनगंटीवार आणि वडेट्टीवार यांच्यात चांगलाच चुरशीचा सामाना बघायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा“आमचा पक्ष फुटला आहे, आता…,” जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य
हेही वाचा…शरद पवार गटाला कोर्टाचा मोठा दिलासा, तर अजित पवार गटाला सुनावले खडेबोल, कोर्टात नेमकं काय झालं?
हेही वाचा…धक्कादायक…! “शांतताप्रिय पुणे शहारात गुंडगिरीचा थैमान, जिंवत महिलेला पेट्रोल टाकून झाळले,”
हेही वाचा…“मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन घेऊन काहीच होणार नाही”, राज ठाकरेंचं रोखठोक मत
हेही वाचातुम्हीही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? भाजपप्रवेशाबाबत जयंत पाटलांनी सोडलं मौन.. म्हणाले…